कामटवाडे सिडको दूषित पाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
नाशिक जनमत. दोन-तीन दिवसापासून सिडको परिसरातील कामटवाडे जुने सिडको या भागातील काही भागात दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणी येत असून नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत तसेच तक्रारी पालिकेकडे देखील केलेले आहेत सध्या सर्दी पडसे खोकला इत्यादी प्रकारचे आजार वाढले आहेत महानगरपालिकेने लवकरात लवकर दुरुस्ती करून शुद्ध पाणी पाणीपुरवठा नागरिकांना अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक 25 मध्ये कामटवाडे मधील लोटस संकुल एकदंत नगर निशांत सोसायटी या ठिकाणी घरामध्ये माती मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे माती मिश्रित पाणी याचे व्हिडिओ नागरिकांनी ऑनलाईन पोर्टलवर देखील तक्रारी केलेले आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये देखील माती मिश्रित पाणी येत आहे. सर्दी पडसे खोकला या आजाराचे रुग्ण वाढलेले आहेत. यात थंडीचे प्रमाण देखील वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.