पोलीस स्टेशन ते प्रदूषण नियंत्रण आधिकारी पर्यंत भरला खोक्यांचा बाजार
नाशिक जनमत चंद्रकांत यांच्याकडून. सध्या दिवाळी चालू असून नाशिक शहरातील पोलीस स्टेशन ते विविध कार्यालयामध्ये सर्वत्र खोक्याचा बाजार भरला असून. दिवाळीची सदर इच्छा म्हणून प्रत्येक अधिकारी पर्यंत खोकेच खोके पोच केले जात आहे. नासिक महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ शहरातील पोलीस ठाणे इत्यादी कार्यालयामध्ये विविध रंगाचे खोके सर्वत्र दिसत आहे. मोठा अधिकारी असेल तर मोठे खोके मध्यमवर्गीय अधिकारी असेल तर मध्यम खोके शिपाई असेल तर लहान खोके अशी वर्गवारी या खोक्यांमध्ये लावली गेली आहे. वर्षभराचे संबंध व त्याची परतफेड म्हणून हे खोके सर्वत्र दिवाळीची भेट म्हणून वाटप होत असतात यातून कोट्यावधी रुपयाची मिठाई व्यवसायिकांची उलाढाल होते. दरम्यान ही खोके 50 कोटी ची नसून मिठाईची खोके आहेत. या खोके मध्ये बदाम काजू मिठाई भरलेली आहे. पैसे नाही. यामुळे पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ निरीक्षकासह सर्वजण खुश आहेत दिवाळीचे देखील मोठ्या प्रमाणात वाटप होत आहे त्यामुळे सध्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये खोक्या वर खोके मिळत असल्याने. अधिकारी वर्ग खुश आहे. यातून वर्षभर कर्मचारी अधिकारी कंपनी मालक आर्थिक संबंध व प्रेम या खोक्यांमधून सर्वत्र दिसत आहे. नाशिक जनमत तर्फे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीचे खोके नव्हे .पण दिवाळीच्या आरोग्यदायी खूप खूप प्रेमदायी शुभेच्छा. दरम्यान मिठाईच्या खोक्या मध्ये मिठीई मध्ये भेसळ आहे की नाही याकडे देखील अधिकारी वर्गाचे. अन्न औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.अनेक कार्यालयामध्ये रात्री उशिरापर्यंत खोक्याची आणि अनेक वाहनांमध्ये ने आन चालू होती.