ब्रेकिंग
सीमा ताई हिरे. देवयानी फरांदे राहुल ढिकले . सरोज अहिरे. यांच्या विजयानंतर नाशिक शहरात जल्लोष
नाशिक जनमत मध्य व पश्चिम विधान सभा मतदार संघात आमदार देवयानी फरांदे,तसेच पश्चिम मतदारसंघातून सीमाताई हिरे, भरघोस मताने विजयी झाल्याबद्दल नासर्डी ते पाथर्डीपरिसरातील भाजपाच्या बालेकिल्लातील माजी नगरसेवकांनी चौका चौकात पेढे वाटून फटाके वाजवून परिसरात मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला.यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,सतीश सोनवणे, सुनील खोडे, माजी नगरसेविका सुप्रिया खोडे,यशवंतनिकुळे, रूपाली निकुळे,डॉ.दिपाली कुलकर्णी,अजिंक्य साने,शाम बडोदे पुष्पा आव्हाड,भगवान दोंदे, सुदाम ढेमसे,अमोल जाधव आदींसह कार्यकर्ते नागरिकांनी जल्लोष.केला पंचवटी परिसर मखमलाबाद पेठ रोड इत्यादी परिसरामध्ये राहुल ढिकले यांच्या मित्र मंडळाने राहुल ढिकले यांची विजय मिरवणूक काढली यात हजारो नागरिक उपस्थित होते. सीमा हिरे यांची सातपूर सिडको परिसरामध्ये विजय मिरवणुकीमध्ये असंख्य महिला नागरिक यांनी भाग घेतला होता डीजेच्या आवाजाने परिसर दुमदुमला होता. नाशिकमध्ये च्या आमदार देवयानी फरांदे यांची मिरवणूक मुंबई नाका परिसर तसेच जुने नाशिक दूध बाजार इत्यादी परिसरात निघाली. मोठ्या संख्येने रॅलीमध्ये भाग घेतला डीजे च आवाजाने परिसरामध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. देवळाली मतदारसंघाच्या सरोज अहिरे पुन्हा निवडून आल्याने देवळाली परिसरासह भगूर शिंदे पळसे जाखुरी परिसरामध्ये विजय रॅली काढण्यात आली.