ब्रेकिंग
तीन वर्षाच्या लेकी सह आईची आत्महत्या मुलगा वाचला.
नाशिक जनमत कोरवली (ता. मोहोळ) येथे तीन वर्षांच्या मुलीसह स्वतः गळफास घेऊन एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. ८) सायंकाळी सहा वाजेदरम्यान घडली आहे. प्रीती विजयकुमार माळगोंडे (२५) व आरोही विजयकुमार माळगोंडे (३) असे मृत माय-लेकीची नावे आहेत. मुलगा बसवराज माळगोंडेचा (दीड वर्ष) जीव थोडक्यात वाचला. मृताचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरूळे (रा. हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर) याने कामती पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अंत्यसंस्कारानंतर लगेचच आरोपी विजयकुमार माळगोंडेला अटक केली.