नासिक पश्चिम विधानसभा मध्ये पैसे वाटण्यावरून राडा.
नाशिक जनमत. नाशिक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून काल नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सावता नगर येथे सुधाकर बडगुजर यांचे कार्यकर्ते मतदारांना स्लीप वाटप करत असताना कोणीतरी नाशिक पश्चिम भाजप महायुतीचे उमेदवार यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप होत असल्याचे सांगितल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यात चाकू सुरे बंदूक याचा वापर केला गेला असल्याचे कार्यकर्ते बोलत आहे. दरम्यान बंदुकीचा वापर झाला नसल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले अंबड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटातून जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळेस दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. अंबड पोलीस ठाण्यामध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त व दंगल पथक यास बोलवण्यात येऊन वातावरण
निवारन्यात यश आले. यात दोन जण जखमी झालेले आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांची सभा असल्याने त्यादेखील अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आल्या होत्या. नासिक पश्चिम मध्ये तेहेरी लढत असून समोरासमोर तुल्यबळ उमेदवार आहेत. मतदान प्रक्रियेस चार दिवस बाकी आहेत. पोलिसां
तर्फे या घटनेचा तपास व सीसीटीव्ह फुटेज तपासल्या जात आहे. अधिक तपास अंबड पोलीस करत आहे.