
नाशिक जनमत. पूर्व मतदार संघाचे शरद पवार गट व महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांना मतदाराचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. नगरसेवक असताना आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात प्रभागाचा विकास केला असून आता ते आमदार झाल्यास पूर्व विधानसभा मतदारसंघाचा विकास नक्कीच करतील अशा मतदारांमध्ये विश्वास असून मोठ्या मताधिक्याने मतदार गणेश गीते यांना भावी आमदार म्हणून निवडून देण्याच्या विचारात असल्याचे चर्चा सध्या पूर्व मतदार संघात ऐकावयास मिळत आहे. गणेश गीते हा कामाचा माणूस असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. काल म्हसरूळ गावातील नागरिकांनी त्यांना पाठिंबा देण्याचा संकल्प तेथेतील रहिवाशांनी केला.
गणेश बबन गीते यांनी मारुती मंदिर मसरूळ प्रभाग क्रमांक एक परिसरातून प्रचारात सुरुवात केली या दौऱ्यात मारुती मंदिर म्हसरूळ गाव वैदुवाडी नायरा पेट्रोल पंप. शिवा हॉटेल. ओंकार चौक .साई मंदिर रिलायन्स पेट्रोल पंप .संपर्क कार्यालय .आरटीओ कॉर्नर .गोरक्ष नगर .किशोर सूर्यवंशी .मार्ग कंसारा माता चौक .येथे पवार आश्रम शाळा रोहिणी हॉटेल या ठिकाणी नागरिकांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. म्हस्रुळ परिसरामध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला विविध सामाजिक संघटनांनी गीते यांना पाठिंबा दिलेला आहे .या वळेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. वाढता पाठिंबा मिळत असल्याने गणेश गीते यांचा विजय नक्की असल्याचे बोलल्या
जात आहे. कॉन्ट्रॅक्टदार ते नगरसेवक स्थायी सभापती नाशिक महानगरपालिका असा त्यांचा कष्टमय व संघर्ष मे प्रवास चालू आहे गरिबीची जाण असलेला असा हा माणूस असल्याचे देखील बोलले जात आहे.