ब्रेकिंग

भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मध्य नाशिक मतदारसंघात मिळणार मताधिक्य  • महिला, युवतींचा मतदारांचा दृढ विश्वास 

भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या मध्य

नाशिक मतदारसंघात मिळणार मताधिक्य

• महिला, युवतींचा मतदारांचा दृढ विश्वास

नाशिक जनमत. ( प्रतिनिधी) – दोन पंचवार्षिकात प्रा.सौ. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा मतदारसंघात पूर्वापार भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. कायमच बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघाचे सूज्ञ मतदार येत्या निवडणुकीत विक्रमी मतदान करतील. दि. २० रोजी अनुक्रम २ पुढील कमळ या निशाणी समोरचे बटण दाबून मोठ्या मताधिक्याने प्रा.फरांदे यांना विधानसभेत पाठवतील असे स्पष्ट मनोगत

मतदारसंघातील सर्वसामान्य महिला, नवमतदार युवती व्यक्त करीत आहेत.

२०१४ व २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकीत आ.सौ. देवयानी फरांदे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या. सलग दोन पंचवार्षिकात आमदार म्हणून जनसेवेची संधी त्यांना मिळाली. त्यांचे सोने केले. या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी ‘ माझं नाशिक ; माझी जबाबदारी ‘ ही संकल्पना राबविली. समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे करून त्यांच्या‌ मनातील अपेक्षेप्रमाणे मतदारसंघात विकास आराखडा तयार केला. तो पूर्णत्वास नेण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. म्हणून आम्ही कायमच प्रा.फरांदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे या मतदारसंघातील सर्व वयोगटातील महिला, नवमतदार युवती सांगतात.

प्रस्तुत प्रतिनिधीने नाशिक मध्य मतदारसंघातील विविध समाज घटकांशी थेट संवाद साधला. तेव्हा सर्वांनी भारतीय जनता पक्ष – महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनाच आपली पसंती असल्याचे निक्षून सांगितले. महिला मतदार म्हणाल्या, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे आमचे सशक्तीकरण होणार आहे. जनतेच्या हक्काच्या पैशातून आम्हाला दरमहा १५०० रुपये मिळवून देण्यासाठी आमदारांनी प्रयत्न केले. मतदारसंघात महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण एक महिला आमदार म्हणून त्यांनी केले आहे. विविध भागात मंदिरे बांधून दिली. त्यामुळे भक्तीमय प्रसन्नता, शांतता निर्माण झाली आहे. भजन, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम सातत्याने होतात. सर्वांमध्ये आपुलकीचा ओलावा व एकोपा वाढीस लागला आहे. मुलांवर चांगले संस्कार होतात.आम्ही समाधानी आहोत.

जाहिरातीसाठी संपर्क 9273020944

 

प्रभाग ७ मधील महापालिकेच्या भाजी बाजार सभागृहात महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल उभारण्याची महत्वाकांक्षी योजना. प्रा. सौ. देवयानी फरांदे यांनी आखली. ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून ही योजना राबविण्यात येत आहे. या मॉलच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना, कलाकौशल्याला बाजारपेठ मिळेल.येथे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, उद्योजकता विकास मार्गदर्शन देखील मिळेल. सामाजिक विकास होऊन कुटुंबे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी,आत्मनिर्भर होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अपेक्षेनुसार विकास घडेल असे महिला प्रतिनिधींनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे