प्रभाग १३ चे मत कमळाला प्रचारफेरीत प्रा.फरांदे यांना प्रतिसाद .
प्रभाग १३ चे मत कमळाला
प्रचारफेरीत प्रा.फरांदे यांना प्रतिसाद
नाशिक जनमत. (प्रतिनिधी) रविवारची संध्याकाळ मतदारांच्या भेटीगाठीने दुमदुमली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा.सौ. देवयानी फरांदे यांनी पदयात्रा काढून मतदारसंघातील बंधू भगिनी व युवा नवमतदारांची भेट घेतली. यावेळी प्रभाग १३ मध्ये भाजपा – महायुतीच्या कमळ निशाणीला भरघोस मतदान करण्याचा संकल्प असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले. उत्स्फूर्तपणे स्वागत करुन भरघोस प्रतिसाद दिला. मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
रविवारी ( दि.१० ) प्रचार यंत्रणा शिगेला पोहोचली. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रा.सौ. देवयानी फरांदे यांनी सकाळी प्रभाग १३ मध्ये काढलेल्या पदयात्रेला मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. सायंकाळी पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली. खूप मोठ्या संख्येने नागरिक पदयात्रेत सहभागी झाले. त्यांनी आपले अमूल्य मत प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महायुतीला अर्थातच प्रा. फरांदे यांनाच असल्याचे वारंवार स्पष्टपणे सांगितले यावेळी पदयात्रेत
गणेश चंद्रकांत मोरे, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, संजय चव्हाण, सचिन विलास मोरे, शिवा जाधव, संतोष दाते, बबलू परदेशी, प्रशांत आव्हाड,उमेश चव्हाण, करुणाताई गायकवाड, नितीन लासुरे
शोभाताई जाधव, स्नेहा खांदवे आदी मान्यवरांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
प्रभाग १३ हा नाशिकचा अत्यंत महत्त्वाचा व मध्यवर्ती भाग आहे. शहराचे हे ह्रदयस्थान अहोरात्र धडधडत असते. येथे शहरातील व्यापार एकवटला आहे. अशा गजबजलेल्या भागात यशवंत व्यायाम शाळेपासून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी अनेक सुवासिनींनी औक्षण करून लाडक्या बहिणीला लाख लाख शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन भरभरून आशीर्वाद दिले. पुढे टेम्पो स्टँड परिसर, धुमाळ पॉइंट, मेनरोड, मंगेश मिठाई कॉर्नर, बोहोरपट्टी मार्गे पदयात्रा सराफबाजारात पोहोचली येथे सोन्या मारुती चौकात भव्य स्वागत सोहळा झाला. नंतर दहीपुल, नेहरुचौक, सोमवार पेठ, तिवंधा चौक, भद्रकाली माता मंदिर या भागातील ठिकठिकाणी नागरिकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
जुनी तांबट गल्ली, येथील ऐतिहासिक रहाड चौक, टांकसाळ लेन, सायंतारा चौक येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गाडगे महाराज पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रा मेनरोडवर मधुकर टॉकीज, चित्रमंदिर टॉकीज भागातील मतदारांशी प्रा. देवयानी फरांदे यांनी संवाद साधला. संपूर्ण पदयात्रेत येत्या २० तारखेला सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत आपल्या जवळच्या मतदार केंद्रावर जाऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तुमचे प्रत्येकाचे मत अमूल्य आहेच. प्रत्येक मतदाराने आपल्यासोबत किमान १० मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असेही कळकळीचे निवेदन प्रा. फरांदे यांनी केले. यावेळी प्रभाग १३ मताधिक्य देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करताच जयजयकार झाला. येथे ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. सुनिती सोसायटी व तिवारी लेन येथेही भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यानंतर यशस्वी पदयात्रेचा समारोप करण्यात आला.