ब्रेकिंग

महाराष्ट्रात विक्रमी मताधिक्याने मंत्री छगन भुजबळ निवडून येतील* *माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा ठाम विश्वास*

*महाराष्ट्रात विक्रमी मताधिक्याने मंत्री छगन भुजबळ निवडून येतील*

 

 

*माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा ठाम विश्वास*

 

 

नाशिक जनमत.   *येवला,दि.११नोव्हेंबर :-* यंदाची निवडणूक ही आरक्षणाची नाही तर विकासाची आहे. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या वीस वर्षात केलेला विकास पाहता यंदा ते महाराष्ट्रात विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा ठाम विश्वास माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी व्यक्त केला.

पाटील पुढे म्हणाले की, एखादा नवीन आमदार निवडून येतो, तेव्हा त्याला विधीमंडळाचे कामकाज समजून घेणे, विकासाठी निधी आणणे आदी बाबींसाठी त्याला जवळपास ५ वर्षे लागतात. त्यामुळे त्या मतदारसंघाला फारसा न्याय मिळत नाही. येवला-लासलगाव मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या ४ निवडणुकांपासून छगन भुजबळ हे मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. त्यांनी केलेली विकासकामे ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. ते केवळ आमदार नाही तर मंत्री झाले. त्यांनी त्यांचे वजन वापरुन मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. त्याजोरावरच आज आपण येवला-लासलगाव मतदारसंघाचा झालेला कायापालट पाहत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्याला नुसता आमदार नको आहे तर मंत्रिमंडळात भक्कम स्थान असलेला मंत्री हवा आहे. त्यामुळेच आपल्या परिसरात विकासाची गंगा वाहणार आहे. विकास हा थांबत नसतो. तो प्रवाही असतो. त्याच्या कार्यात अडथळे येणार नाहीत. याची आपण काळजी घेतली पाहिजे. भुजबळ यांना विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळेच त्यांनी मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात आणि विविध घटकांसाठी विकास योजना राबविल्या आहेत. त्यामुळेच आपला परिसर हा राज्यभरात नावाजला जातो आहे. आता आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी भुजबळ यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान यंत्रावरील घड्याळ या निशाणी समोरील बटण दाबून आपले अमूल्य मत द्यावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे