ब्रेकिंग

नासिक पश्चिम मध्ये सुधाकर बडगुजर यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद.

नाशिक जनमत.  उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ मध्ये श्री सुधाकर बडगुजर हे उभे आहेत त्यांनी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला नामांकन अर्ज भरला. रॅली मधील असलेली गर्दी यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येत आहे. सिडकोतील सावता नगर या ठिकाणी सुधाकर भाऊ बडगुजर राहतात. या भागात ते व त्यांच्या पत्नी या नगरसेवक अनेक वेळेस  होत्या. जेष्ठ नागरिक असो किंवा प्रभागातील सिडकोतील कोणतीही समस्या भाऊ कडे घेऊन गेल्यास त्या ताबडतोब फोन करून सुधाकर भाऊ बडगुजर सोडवतात असे ज्येष्ठ नागरिक व प्रभागातील सर्व व्यक्ती सांगतात. दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांचा सिडकोतील नागरिकांना देवदर्शन करण्या साठी स्वतः खर्च करून ते तीर्थ वारी मतदारांसाठी करत असतात. सिडकोतील पाणी प्रश्न अन्न वस्त्र निवारा इत्यादी समस्यासाठी नेहमी तत्पर असतात. एक बुलंदी तो असा त्यांचा दरारा आहे. अधिकाऱ्यांना आक्रमक प्रमाणे धारेवर धरून नागरिकांच समस्या ताबडतोब सोडवा असे सांगणारे महानगरपालिका  विभागीय कार्यालय या ठिकाणी हे नेहमी दिसतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी एकनिष्ठ असे ते कार्यकर्ते नेते आहेत. आपल्या चांगल्या स्वभावामुळे महिला वर्गासह पुरुष मतदार युवक मतदार त्यांच्या पाठीशी आहेत. नासिक महानगरपालिकेत अनेक पद्धतीने भूषवले आहेत त्यांच्या नागरिकांच्या सेवा व समस्या सोडवण्यास ते तत्पर असतात. सिडकोतील बेरोजगारी युवकांसाठी रोजगार. नागरिकांच्या आरोग्यासाठी सिडकोमध्ये मोठे हॉस्पिटल. व सातपूर अंबड एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आणणे आयटी कंपनी आणणे व बंद पडलेल्या कंपन्या चालू करून सिडको भागातील नागरिकांना मोठ रोजगार मिळवण्यासाठी चे प्रयत्नशील आहेत. त्यांची निशाणी मशाल असून नागरिक व मतदार त्यांना वीस तारखेस मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून देणार आहे असे अनेक मतदारांनी नाशिक जन्मत कडे बोलून दाखवले. सिडको मध्ये सुधाकर बडगुजर हे सुधा भाऊ नावाने प्रसिद्ध आहेत अनेक जण त्यांना प्रेमाने सुधा भाऊ मन्हतात. प्रचार रॅलीमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद

 

 

मिळत आहे. आनेक ठिकाणी त्यांचे ऑक्शन करून त्यांना मतदान रुपी आशीर्वाद देणार असे महिला व मतदानातर्फे सांगण्यात येत आहे. सिडको सातपूर सर्व मतदारसंघ माझा परिवार असून त्याचा विकास हाच माझे ध्येय आहे असे सुधाकर यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे