ब्रेकिंग

जितेंद्र आव्हाड सह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये गणेश गीतेचा अर्ज दाखल.

नाशिक जनमत.  नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांनी आपल्या हजारो समर्थकांसह आज अर्ज दाखल केला. यावेळी समर्थकांमध्ये आनद  व्यक्त केला जात होता. मुंबई येथून शरद पवार गटाचे माजी

 

 

 

मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील अर्ज भरण्यासाठी आले होते. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर विविध आरोप करत गणेश गीते हे शंभर टक्के पूर्व मध्ये विजय होतील असे नाशिक जन्मतला सांगितले. गणेश गीते यांनी सांगितले की मी नगरसेवक व स्थायी सभापती असताना माझ्या प्रभागासह संपूर्ण नाशिक शहरात  घरोघरी जाऊन आलो आहे. प्रत्येकाच्या  सुख दुःखाच्या च्कर्यक्रमात सहभागी झालो आहे. माझे कार्यालय व कार्यालयातील कर्मचारी नागरिकांच्या समस्या ताबडतोब सोडवत असतात. त्यामुळे पूर्व विधानसभा

मतदारसंघातील मला चांगली माहिती असून मी  मतदार संघाचा मोठ्या प्रमाणात विकास करणार आहे. विरोधकांचे नाव न घेता त्यांनी सांगितले की आपण गेल्या पाच वर्षातील विकास बघितला आहे. शहरातील रस्ते तसेच अनेक समस्या जशा आहे तसेच आहे. त्या मी सोडवणार आहे. माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांची झोप उडाली आहे. आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव मी उभा आहे. आपले बहुमूल्य मत तुतारी निशाणीला देऊन भरघोस मतांनी मला विजयी करा. पूर्व विधानसभा मतदार संघ हे माझे कुटुंब असून मतदार

 

 

 

 

संघाचां विकास करणार आहे. ज्यावेळेस अनेक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी गणेश भाऊ गीते आप आगे बढो. हम आपके साथ है. अशा घोषणा दिल्या. गणेश भाऊ विजयी होणार. असेही समर्थकांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. मोठ्या आनंदी वातावरणामध्ये गणेश गीते यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे