ब्रेकिंग

रस्त्यावर दुचाकी घसरून दोन तरुणांचा मृत्यू. सिटी सेंटर रस्त्यावर खडी वरून घसरल्याने झाली घटना. दुर्दैवी घटना.

¢नाशिक जनमत.     लवकर दिवाळी चालू होत आहे दिवाळी सणाच्या सुरुवातीलाच नाशिक शहरामध्ये दोन तरुणांचा दुचाकी घसरून मृत्यू झाला यामुळे नाशिक शहरात शोक व्यक्त करण्यात येत आहे

सीबीएस ते सिटी सेंटर मॉल च्या रस्त्याने दुचाकीने जाणाऱ्या दोन महाविद्यालयात तरुणाचा बांधकाम भवना जवळील रस्त्यावर दुचांकी  घसरून अपघात झाला. डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघांनाही जीव गमावा लागला. रस्त्यावर पसरलेल्या खडी  व कच मुळे त्यांची दुचाकी घसरल्याचे प्रत्यय दर्शनी कडून सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे महानगरपालिका प्रशासनाच्या आना गोदी कारभारावर टीका होत आहे.

26 सप्टेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अभिजीत अशोक मराठे वय 23 पाथर्डी फाटा दामोदर नगर व मयूर जगदेव कावरे   अष्टविनायक नगर सावता नगर सिडको हे दुचाकी ने जात असताना रस्त्यावर तोल गेला व ते दुभाजकावर आपटून दोघांना डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही नागरिकांनी दोघा जखमी तरुणांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत्यू त्यांना घोषित केले याबाबत मुंबई नाका पोलीस मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

अभिजीत मराठे हा एमसीएचे शिक्षण घेत होता त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून तो एकुलता एक होता आई-वडील पाथर्डी फाटा येथे दामोदर नगर येथे राहतात.

रस्त्यावर टाकण्यात आलेली कच व त्यावर डांबर न टाकल्याने रस्त्यावरील खड्डे बुजत नाही व त्यावर वाहने घसरत असल्याचे नाशिक शहरात अनेक ठिकाणी चित्र आहे त्यामुळे लहान मोठे अपघात दररोज चालू आहे खडी मुरूम टाकून त्यावर कायमस्वरूपी रस्ता करणे गरजेचे आहे दरम्यान फक्त कच टाकल्यामुळे वाहने घसरत आहे. हे दोन्ही विद्यार्थी शनिवारी विद्यालयात पेपर असल्याने अभ्यास करत होते. फ्रेश होऊन अभ्यास करावा म्हणून ते चहा घेण्यासाठी निघाले होते. दरम्यान रस्त्यावरून घसरल्याने तोल जाऊन त्यांचा अपघात झाला हाता पायाला मार  डोक्याला मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली असून परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे