ब्रेकिंग

दिवाळी अगोदरच चोरांची दिवाळी. एका दिवसात सहा ठिकाणी घरफोड्या. दहा लाखाच मुद्देमालचोरीला.

नाशिक जनमत. दिवाळीला अजून पंधरा दिवस बाकी असताना नाशिक शहरात चोरट्यांनी दहा लाखाचा मुद्देमाल भर दिवसा एका दिवसात चोरला आहे. मसूर पंचवटी अंबड भागात भर दिवसा मध्यवस्तीत चोऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस यंत्रणे कडून ग्रस्त व नाकेबंदी बंद असल्यामुळे एका आठवड्यात सतरा घटना घडल्या आहेत.

पोलिसांकडून दिवसा गस्त व नाकेबंदी होत नसल्याने यंत्रणांना  उत्सवाच्या काळात करती तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सातपूरच्या अशोक नगर नवीनच सुरू झालेल्या प्रगती टेक्स्टाईल च्या शोरूम मध्ये पंधरा दिवसात दुसऱ्यांदा चोरांनी चोरीची घटना घडवली 19 सप्टेंबरला रात्री चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावर चालत खिडकीचे गज कापून प्रवेश करत साडेसात लाखाची रक्कम लंपस केली होती पुन्हा सुमारे 80 हजारावर कार्डला मारलेला आहे दोन्ही घटना सीसीटीव्ही कैद झालेला आहे . चार घटना भर दिवसा झालेल्या आहेत. मसरूळ येथे मखमलाबाद लिंक रोड येथील रहिवासी सोनाली पवार ह्या सकाळी अकरा वाजता लहान बाळाला औषध उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. दोन तासांनी त्या घरी परतल्या त्यावेळेस घराच्या बंद दरवाजाची कडी तोडून कपाटातील सुमारे चार लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरल्याची दिसून आले. दुसरी घटना दिंडोरी रोडवरील शानू डफळे यांच्या बंद घराचा दरवाजाची कडी तोडून सुमारे दोन लाखाचा सोन्याचांदीचे दागिने व रक्कम असा ऐवजी लांबवला आहे. मसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामटवाडा परिसरामध्ये भर वस्तीत योगेश्वर आपारमेंट मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणारे संदीप शंकर नेरकर हे आपल्या कुटुंबियांसोबत दसऱ्यानिमित्त घराजवळील मंदिरात सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान गेले होते एका तासांमध्ये ते घरी आले असता दरवाजाच्या कडी कोंडा तुटलेला दिसला घरातील दीड लाखाची चोरी झाल्याचे त्यांना दिसून आले. शेजारच्या नागरिकांनी सांगितले की चोरट कार मध्ये आले होते. याची माहिती अंबड पोलिसांना दिली असून अजून चोरांचा तपास लागलेला नाही. दरम्यान या घटनेमुळे नागरिक घाबरलेले आहेत. नागरिकांनी आपले घर सुरक्षित ठेवण्यासाठी सोसायटी सीसीटीव्ही लावा घराच्या दरवाजांना सेफ्टी लोखंडी डोर बसवा .खिडक्यांना सेफ्टी जाळी बसवा. टेरेस वरील दरवाज्यला सेफ्टी दरवाजा बसवा. अनोळखी व्यक्ती आल्यास पोलिसांना कळवा. सोसायटीत वाचमन. सुरक्षारक्षक ठेवा. जास्त रक्कम घरी ठेवू नका. बाहेर जात असाल तर

 

 

शेजाऱ्यांना सांगा. दागिने बँकेत अथवा विश्वासाच्या नातेवाईकाकडे ठेवा. असे पोलिसां तर्फे  आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी रात्रीची व दिवसाची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे