ब्रेकिंग

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४* *सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी* *जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांचे आढावा बैठकीत निर्देश*

*महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४*

*सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी*

*जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांचे आढावा बैठकीत निर्देश*

*नाशिक, दि. १६ नाशिक जनमत.  (जिमाका वृत्तसेवा) :* मा. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील १५ मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी सर्व समन्वयक अधिकाऱ्यांनी समन्वयाने आपापली जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी निवडणुकीशी संबंधित सर्व समन्वयक अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी ओंकार पवार, नरेश अकुनुरी, उपविभागीय अधिकारी
अर्पित चौहान, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व नोडल अधिकारी, संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच मतदान प्रक्रिया सुलभपणे पार पडेल, असे नियोजन करावे. मतदान केंद्रांची पाहणी करून आवश्यक मूलभूत सोयीसुविधांची पूर्तता करावी. ८५ वर्षांवरील मतदारांसाठी गृह मतदानाचे अचूकपणे नियोजन करावे. प्रत्येक मतदान केंद्रावरील मनुष्यबळाचे नियोजन करून त्यांना प्रशिक्षित करावे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी

 

 

 

मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत, असे सांगत उमेदवारी अर्ज दाखल करून घेताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयावरही त्यांनी मार्गदर्शन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे