जळगाव चा चोरटा करत होता घरफोड्या. 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत. अंबड पोलिसांना यश.
नाशिक जनमत. प्रतिनिधी अंबड पोलीस ठाणे अंतर्गत घरपोडीतील आठ गुन्ह्याची उकल करण्यात अंबड पोलिसांना यश आले असून जळगाव जिल्ह्या मधील चोरट्याकडून 13 लाख 54 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
अंबड पोलिसांच्या माहितीनुसार संशय फारूक राज्याक काकर भद्रकाली बागवानपुरा व राहणार मूळ पाचोरा जिल्हा जळगाव हा नाशिक शहरातून जळगाव येथे ये जा करत असायचा त्याचा भांडी विक्रीचा व्यवसाय होता भांडी व्यवसायाच्या नावाखाली बंद असलेले घर तो दिवसा बघत असायचा व त्याची पाहणी करत होता. पाहटे च्या सुमारास तो या घर परिसरामध्ये फिरून घरफोडी करत होता. त्याने अश्विन नगर खुटवड नगर तानाजी चौक पांगरे मळा माऊली लॉन्स येथे एकूण आठ घर फोडी केल्या होत्या. दरम्यान तो मध्यवर्ती बस स्थानक ठक्कर बाजार येथे आला असता सापळा असून आंबट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी एकूण ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार तसेच पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट उपनिरीक्षक झनकसिग घुणावत यांचा या पथकात समावेश होता . अंबड परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.