अंबड पोलीस ठाण्याचे ठाणे आमलदार शेख फोनवर ज्येष्ठ पत्रकारांला माहिती मिळणार नाही. माहिती हवी असल्यास पोलीस स्टेशनला यावे लागेल. अशी शेख यांची सक्ती.

नासिक जनमत अंबड पोलीस ठाणे हद्दी मधले डी जेपी नगर दोन भागामध्ये शनिवारी रात्री माऊली लॉन्स कडून डी जे पी नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर साडेबारा ते एकच्या दरम्यान तुफान हाणामारी असे वृत्त सकाळी या परिसरात पसरले अंबड पोलीस ठाण्याची पोलीस व्हॅन व दोन पोलीस त्या ठिकाणी येऊन थांबले तसेच नागरिकांची गर्दी देखील झाली होती परंतु. आजूबाजूच्या दुकानदाराने आपली दुकाने बंद करून चौकशीच्या भीतीने निघून गेलेत. दरम्यान पत्रकार चंद्रकांत धात्रक हे बाहेर असल्याने त्यांच्या एका मित्राने नाव न सांगण्याच्या वरून सांगितले की पोलीस गाडी आली असून एक तास झाला आहे विचारपूस चालू आहे पंचनामा होत आहे दरम्यान पोलीस गाडी व गर्दीचा व्हिडिओ चंद्रकांत धात्रक नाशिक जन्म संपादक यांनी त्यास काढण्यास लावला. व घटनेचे गांभीर्य जाणून घेऊन
अंबड पोलीस स्टेशनला 01:42मिनिटांनी फोन केला यावेळी अंबड पोलिस स्टेशनचे ठाणे आमदार शेख होते यावेळेस त्यांच्यामध्ये व चंद्रकांत धात्रक पत्रकार यांच्यात सवाद झाला. पत्रकाराने विचारले की ही सर मी चंद्रकांत धात्रक नाशिक जनमत संपादक बोलतोय तिकडून त्यांनी सांगितले की कोणत्या पेपरचे तुम्ही कोणत्या चैनल चे यावेळेस धात्रक यांनी सांगितले की मी नाशिक जन्मत संपादक बोलतोय बोला काय झाले सर काल रात्री डी जे पी दोन परिसरामध्ये बारा ते एक च्या दरम्यान एक घटना घडली असून सध्या त्या ठिकाणी पंचनामा पोलीस गाडी उभी आहे गर्दी आहे या घटनेविषयी माहिती हवी आहे. च्या वरून तिकडून उत्तर आले की पत्रकारांना फोनवरून बातमीची माहिती दिली जाणार नाही.
तुम्हाला प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला यावे लागेल. यावेळेस जेष्ठ पत्रकार चंद्रकांत धात्रक यांना धक्का बसला कारण की नेहमी बातमीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशनला फोन केला असता अगदी फोनवरच सर्व ठाणे अंमलदार माहिती पत्रकारांना देत असतात .दरम्यान त्या बातमीत काय गुपित होते तेच समजले नाही. एकीकडे 15 ऑगस्ट रोजी झालेली दंगल नाशिक पोलिसांनी नियंत्रणात आणून जातीय सलोखा घडून आणला व वातावरण निवळले. या पत्रकाराने देखील महत्त्वाची भूमिका बजावली. दरम्यान या घटनेची दखल घेऊन मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व नाशिक मधील नाशिक मधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे भरभरून कौतुक केले व आयुक्तांचा सत्कार देखील केला. दरम्यान असे चांगले काम करत असताना एका ज्येष्ठ पत्रकार आला माहिती का देण्यात आली नाही हे मात्र गुपित आहे गेल्या पंधरा वर्षापासून नासिक हे ज्यष्ठ पत्रकार नाशिक शहरात चाललेल्या चांगल्या वाईट गोष्टी जनतेसमोर आणत असतात. दरम्यान ठाणे अंमलदार यांनी माहिती न दिल्याने बातमीचे गुपित शेवटी समजलेच नाही.
दरम्यान घटनेची माहिती न देणाऱ्या ठाणे अंमलदार यांच्यावर पोलीस आयुक्त कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत धात्रक या घटनेबाबत पोलीस आयुक्तांकडे लेखी निवेदन देणार आहेत दरम्यान या घटनेची माहिती जनतेसमोर यावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत धात्रक यांनी केले आहे.