ब्रेकिंग

आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतील पंडित नगर सिडको येथील सप्तश्रृंगी माता मंदिर सभामंडप लोकार्पण संपन्न*

*आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतील पंडित नगर सिडको येथील सप्तश्रृंगी माता मंदिर सभामंडप लोकार्पण संपन्न*

नाशिक जन्मत. वार्ताहर दि. 30:- आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतुन गणेश चौक सिडको येथे श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सभामंडपाच्या कामाचे भुमीपुजन आमदार सीमाताई महेश हिरे, नगरसेविका छायाताई देवांग, निलेश ठाकरे, भाग्यश्री ढोमसे महेशजी हिरे, रवि पाटील यांच्या शुभहस्ते लोकार्पण संपन्न् झाले.

यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी मनोगतात सांगितले की, गेल्या 9 वर्षात मतदार संघात सभामंडप, विरंगुळा केंद्र, जिम्नॅशियम हॉल, अभ्यासिका, जॉगिंग ट्रॅक, रस्ते ग्रीन जीम तसेच पेलिकन पार्क याशिवाय मतदार संघातील धोकादायक वीजवाहीन्या भुमीगत करणे आदि स्वरुपाचे विकास कामे करण्यात आली मतदार संघातील सिडको कार्यालयाचे स्थलांतर असो वा सिडकोच्या मिळकतींना अतिक्रमणच्या नोटीसा असो हे थांबविण्याचे काम आपल्या आशिर्वादाने करु शकले. मतदार संघाचा विकास कसा होईल यासाठी काय करता येवू शकेल या एकच ध्यासाने प्रेरित होवून आजपर्यंतची वाटचाल सुरु आहे.

याप्रसंगी नगरसेवक निलेश ठाकरे, छायाताई देवांग, रवि पाटील यांनी देखिल मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी महेश हिरे, नगरसेविका छाया देवांग, निलेश ठाकरे, भाग्यश्री ढोमसे, रवि पाटील, आर.आर.पाटील, शिवाजी बरके, वैभव महाले, परमानंद पाटील, यशवंत पवार, दशरथ गांगुडे्र, राजेंद्र जडे, गौरव केदार, प्रविण मोरे, अमोल खंदारे, करण शिंदे, सानप सर, उत्तम काळे, महेंद्र पाटील, जगदीश काकडे रोहन कानकाटे, कैलास उंबरे, बाळासाहेब धोत्रे, बापुसाहेब कटारे, प्रकाश दराडे, विठ्ठल नगरे, भगवान सानप आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे