सिडकोच्या हेगडेवार चौकात महिलेची छेड काढणाऱ्या युवकांना महिला व त्यांच्या मुलीने दिला चोप. तूच तुझ्या जीवनाची सुरक्षान करता. सर्वत्र होते कौतुक.
नाशिक जनमत पवन नगर येथील महिलाकाही काही कामानिमित्त हेगडेवार चौक येथे आली होती यावेळेस काही टवाळखोर हे बाकड्यावर बसले होते त्याच वेळेस समोरून जाणाऱ्या महिलेची छेड काढण्याच्या उद्देशाने हात द्वार केले. यावेळेस या महिलेने त्यांना विचारपूस केली असता उडवा उडवी चे उत्तर दिले यावेळेस तिच्या संताप अनावर झाला त्यातच तिची मुलगी व तिची मैत्रीण घटनास्थळावर आल्या आईची छेड काढत असल्याचे पाहून फिल्मी स्टाईलने टवाळ खोरांच्या जोरात कानात हाताचा पंजा मारला जवळच असलेल्या भंगार्याच्या गाडीवर नेऊन खुर्ची उचलून टवाळ खोरांना चांगला दणका दिला. तिने महिलांनी दुर्गा देवीचे रूप धारण केल्याने टवाळखोर या ठिकाणाहून पळून गेले दरम्यान हे छायाचित्र सीसीटीव्हीत कैद झाले आणि वायरल देखील झाले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पोलिसांनी चारही संशयित युवकांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्यावर कारवाई चालू आहे.यातील एक युवक अल्पविन आहे टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नाशिक शहरातील महिलांनी केली आहे अशा टवाळखोरांवर कारवाई करावी यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर करत आहे दरम्यान या आई मुलगी व मैत्रिणीचा आदर्श घेऊन महिलांनी पुढे येऊन टवळाखोरना स्वतः चोप द्यावा. व अशा घटनेची माहिती ताबडतोब पोलीस स्टेशनला द्यावी . असे पोलीस आयुक्त यांनी सांगितले आहे .या घटनेची मोठ्या प्रमाणात सध्या चर्चा होत असून सर्वत्र या आई मुलगी व मैत्रिणीच कौतुक होत आहे