सीएच्या अंतिम परीक्षेत जैन ओसवाल बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांचे दणदणीत यश.*
*सीएच्या अंतिम परीक्षेत जैन ओसवाल बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांचे दणदणीत यश*
*नाशिक जनमत. आयसीएआय (द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउण्टंट्स ऑफ इंडिया) च्या वतीने घेण्यात आलेल्या सीए इंटर अँड फायनल परीक्षेत नाशिकच्या श्री जैन ओसवाल बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांनी दणदणीत यश पटकावले. मे-२०२४ मध्ये झालेल्या या परीक्षेत १८ पैकी १४ विद्यार्थी उल्लेखनीय गुणांनी उत्तीर्ण झाले. आपल्या यशस्वी वाटचालीने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.*
*शिक्षणासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांचे हे फलित असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी, प्रमुख सेक्रेटरी शशिकांत पारख, खजिनदार अशोक साखला व विश्वस्तांनीव्यक्त केली. आमच्या कष्टाळू, गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे. यापुढेही समाजाच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या सुविधांचा लाभ घेता यावा आणि उज्ज्वल भविष्य घडवता यावे, यासाठी संस्थेच्या सेवा सुविधेचा विस्तार सुरू आहे. सद्यस्थितीत बोर्डिंगची ७७५ विद्यार्थी क्षमता २०३० पर्यंत तब्बल १५०० पर्यंत वाढविण्याचा मानस असल्याची माहिती अध्यक्ष भंडारी यांनी दिली