बनावट दस्त तयार करणाऱ्रे अंबड पोलिसांच्या ताब्यात.
नाशिक जनमत. जागा मालकाच्या नावाने बनावट दस्त तयार करत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्या. प्रकरणी चार जना विरोधात अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दुय्यम निरीक्षक शरद दवंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कार्यालयात असताना संशयित रवी दोंदे पेठ रोड याने कालिदास परमार राहणार बडोदा यांचे मूळ जागा मालक गोपाळकृष्ण नायर या नावाने बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार केले. या आधारे मूळ जागा मालक नायर यांचा मखमलाबाद येथील प्लॉट हरेश कुमार पटेल प्रकाश कुमार पटेल यांच्या नावे बनावट दस्त तयार केले. या दस्तावर संशयित संतोष जाधव हर्षद सोलापूरकर या दोघांनी ओळख साक्षीदार म्हणून सही केली. दस्त तपासणी करत असताना दवंगे यांना संशय आला. त्यांनी या संशयित विषयी तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे