ब्रेकिंग
नासिक मधील आडगाव जवळील घटना.आयशर व ब्रिज्या कार मध्ये अपघात चार ठार.
नासिक जनमत प्रतिनिधी. काल रात्री आडगावकडून नाशिककडे येणारी ब्रिजा कार संपूर्ण चक्काचूर झाली आहे. या कारमध्ये प्रवासी होते हे सगळे मृत्युमुखी पडले. कारचा चेंदामेंदा झाल्याने. नाशिक अग्निशमन दलाचची मदत मागविण्यात आली. कोणार्कनगर विभागाचे बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून बकारचा पत्रा कापून मृतदेह काढण्यात आले. या अपघातात रहेमान सुलेमान तांबोळी (४८) त्यांचा भाचा अरबाज चांदुभाई तांबोळी (२१, दोघे. रा.लेखनगर सिडको), सीज्जू शेख पठाण (३८,रा.इंदिरानगर), अक्षय जाधव (२४,रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) या चौघांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहीती आडगाव पोलिसांनी दिली.
- भाजीपाला विक्रीचा व्यवसाय असल्याने हे सगळे जण देवळा तालुक्यातील सटाणा येथे गेले होते. तेथून व्यवसाय आटोपून घराकडे नाशिकच्या दिशेने परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली. चौघांवर काळाने झडप घेतली. अरबाजचा महिनाभरपूर्वीच साखरपुडा झाला होता. रहेमान तांबोळी यांनी पंधरवड्यापूर्वी ठाणे येथून जुनी कार खरेदी केली होती, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.रहेमान यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, ५बहीणी असा परिवार आहे. ते घरातील कर्ता पुरुष होते.