भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो गीत व नाटक प्रभागाच्या जनजागृती पॅनलवर नाशिक जिल्ह्यातून आनंदतरंग फाउंडेशन(रजि.) अंतर्गत शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांच्या आनंदतरंग लोककला पथकाची पुणे येथे निवड
भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय अंतर्गत असणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो गीत व नाटक प्रभागाच्या जनजागृती पॅनलवर नाशिक जिल्ह्यातून आनंदतरंग फाउंडेशन(रजि.) अंतर्गत शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांच्या आनंदतरंग लोककला पथकाची निवड पुणे येथे करण्यात आली असून नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ उर्फ पराग वाजे यांनी उत्तम गायकर आणि सहकारी यांचा सत्कार करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातील अनेक कलासंचांनी पुणे येथील जवाहरलाल नेहरू सांस्कृतीक भवन, घोले रोड, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र गोवा राज्यस्तरीय लोककला सादरीकरण स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील आनंदतरंग कलापथकाचे शाहीर उत्तम गायकर आणि सहकारी यांची निवड झाली.
गेल्या अनेक वर्षापासून आनंदतरंग लोककलापथक भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामार्फत राष्ट्रीय एकात्मता, संप्रदायिक सद्भाव,पर्यावरण संतुलन, लसीकरण मोहीम, आयुष्यमान भारत, एड्स ,कोरोना महामारी स्वच्छ पाणी स्वच्छ भारत, महिला सक्षमीकरण, बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक न्यायाच्या जनकल्याणकारी योजना व्यसनमुक्ती, मलेरिया निर्मूलन, राष्ट्रीय कृषी विकास ,शेतकरी आत्महत्या, आरोग्य समस्या, लैंगिक समानता, कुपोषण, पोषण अभियान, माहितीचा अधिकार, मतदार जनजागृती, शिक्षण, हागणदारी मुक्त योजना, वृद्ध मायबाप सेवा इत्यादी विषयावर गीत, संगीत, संवाद, नाट्याद्वारे प्रभावीपणे जनजागृती व प्रबोधन करत आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी नामदेव गणाचार्य , बाळू साळवे , शिवाजी गायकर ,विशाल गणाचार्य ,ओमकार गायकर ,दुर्गेश गायकर ,दौलत घारे ,खंडू बोबडे ,गणेश जाधव ,योगेश जाधव , प्रशांत भिसे ,पंढरीनाथ भिसे,सिताराम जाखेरे , रामकृष्ण मांडे व्याख्याते समाधान हेंगडे पाटील , शंकरराव दाभाडे यांनी परिश्रम घेतले .