ब्रेकिंग

कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व सर्ग विकास समिती, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ . पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत मौजे लोहशिंगवे येथे प्रशिक्षण शिबिर.

नाशिक जनमत प्रतिनिधी. विजय हेबाडे यांच्याकडून. सदर माहिती  कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व सर्ग विकास समिती, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ . पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत मौजे लोहशिंगवे येथे दि.27 जुन 2024 रोजी , स्थळ- श्री.विजु दगु हेंबाडे,लोहशिंगवे यांच्या शेतात जैविक निविष्ठा निर्मिती या विषयावर शाकांबरी शेतकरी गट लोहशिंगवे या सेंद्रिय गटांचे गावपातळीवरील शेतकरी सदस्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून सदर प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाचे कृषि सहाय्यक, वडाळी बु श्री.विरेंद्र तवले व आत्मा चे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.एस.टी.कर्नर व सर्ग विकास समिती अकोला संस्थेचे प्रतिनिधी श्री.नितिन वारके हे उपस्थित होते.त्यानंतर सर्ग विकास समिती ,अकोला या संस्थेचे प्रतिनिधी श्री.नितीन वारके यांनी सेंद्रिय निविष्ठा तयार करणे त्यामध्ये सी.पी.पी.कल्चर, बायो डायनॅमिक कंपोस्ट खत निर्मिती, जीवामृत ,बीजामृत , दशपर्णी अर्क,निमार्क,दहा ड्रम थेअरी इत्यादी चे प्रात्यक्षिक द्वारे मार्गदर्शन केले.तसेच या निविष्ठांचा सेंद्रिय

पध्दतीने उत्पादन घेण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व किड व्यवस्थापनासाठी वापर करावा तसेच पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजने बाबत सेंद्रिय प्रमाणाकिरण पध्दती, शेतमाल पॅकेजिंग, ग्रेडिंग व लेबलिंग करून विक्री व्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले.तसेच कृषि सहाय्यक श्री.एस.टी.कर्नर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रासायनिक खते व कीटकनाशके वापरल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले असून मानव,पशु,पक्षी व पर्यावरण यावर विपरीत परिणाम होत आहे.या साठी सेंद्रिय पद्धतीने शेतमाल

 

 

उत्पादन करुन शेतकऱ्यांनी शेतकरी गट व शेतकरीउत्पादक कंपनी च्या माध्यमातून विक्री व्यवस्थेसाठी पिकाची मुल्य साखळी उभारावी .तसेच यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी गटातील योजनेत सहभागी असलेले लोहशिंगवे या शेतकरी गटांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचीव व सदस्य इ. उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.विरेंद्र तवले कृषि सहाय्यक ,वडाळी बु यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे