ब्रेकिंग

शासकीय तांत्रिक विद्यालयात* *अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू*

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती लाभासाठी* *राईट टू गिव्ह अप पर्यायासाठी 30 जूनची मुदत*

 

*शासकीय तांत्रिक विद्यालयात*
*अकरावी द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू*

*नाशिक, दिनांक 27 जून, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* शासकीय तांत्रिक विद्यालय, त्र्यंबक नाका, नाशिक येथे इयत्ता ११ वी द्विलक्षी (बायफोकल) अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थांनी संस्थेच्या संलग्न महाविद्यालयांतून इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन द्विलक्षी अभ्यासक्रमाची निवड करावी, असे आवाहन मुख्याध्यापक सुनिल कुमावत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

शासकीय तांत्रिक विद्यालयात द्विलक्षी (बायफोकल) अभ्यासक्रमासाठी इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 50 जागा, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स अभ्यासक्रमासाठी 100 जागा व मॅकेनिकल मेंटेनन्स अभ्यासक्रमासाठी 100 जागा अशा एकूण 250 जागा उपलब्ध आहेत.

नाशिक शहरातील भोसला मिलिटरी कॉलेज, गंगापूर रोड, बिटको कॉलेज, नाशिकरोड, लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेज, पंचवटी, आर.वाय.के. कॉलेज, कॉलेज रोड, वाय. ई. डब्ल्यू. एस. (यूज) नॅशनल हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, सारडा सर्कल, रमाबाई आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, बॉईज टाउन कनिष्ठ महाविद्यालय, राजर्षि छत्रपती शाहु महाराज कनिष्ठ महाविद्यालय व रूद्र द प्रॅक्ट्रिकल स्कूल अशी एकूण नऊ कनिष्ठ महाविद्यालये शासकीय तांत्रिक विद्यालयाशी संलग्न आहेत.

विद्यार्थ्यांनी या संलग्न महाविद्यालयात सायन्स शाखेत प्रवेश घेतल्यानंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अप्लाय फॉर बाय फोकल या टॅबवर क्लिक करून विषय ( इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मॅकेनिकल मेंटेनन्स) यापैकी एक निवडून सबमिट करावे. या संलग्न महाविद्यालयांतून सर्व प्रवेश जागांवर शासन नियमानुसार शंभर टक्के जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

अकरावी प्रवेशात एक भाषा व एक वैकल्पिक विषय याऐवजी द्विलक्षी अभ्यासक्रमाचे 200 गुणांचे विषय घेता येतात. या अभ्यासक्रमात 50 ते 60 टक्के प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत असल्यामुळे चांगले गुण प्राप्त करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळते. तसेच इयत्ता १२ वी नंतर पुढील तांत्रिक शिक्षण व इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास बायफोकल अभ्यासक्रमामुळे पाया भक्कम होवून याचा निश्चितच फायदा होतो.

अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष शासकीय तांत्रिक विद्यालयात अथवा विभाग प्रमुख नरेंद्र नेरकर (भ्रमणध्वनी क्र. 8788978431) यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

*महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती लाभासाठी*
*राईट टू गिव्ह अप पर्यायासाठी 30 जूनची मुदत*

*नाशिक, दिनांक 27 जून, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* आदिवासी विकास विभागांतर्गत तालुक्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ देण्यासाठी शासनाकडून सन 2018-19 पासून महाडीबीटी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर राईट टू गिव्हअप पर्याय निवडलेल्या अर्जदारांना हा पर्याय पुन्हा निवड करण्याबाबत 30 जून 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिकचे प्रकल्प अधिकारी अरूणकुमार जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या नाशिक प्रकल्प कार्यालयांतर्गत नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड, येवला, दिंडोरी, इगतपुरी आणि पेठ या तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ देण्यात येतो.

महाडीबीटी पोर्टलवर संस्थेच्या Principal लॉगिनमध्ये ही सुविधा 30 जून 2024 पर्यंत उपलब्ध राहणार असून ज्या अर्जदार विद्यार्थ्यांनी राईट टू गिव्ह अप पर्याय निवडला असेल, अशांनी राईट टू गिव्ह अप पर्याय पुनर्निवडीसाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.

*जुलै महिन्यातील लोकशाही दिन रद्द*
*: निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ*

*नाशिक, दिनांक 28 जून, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* पदवीधर व शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमिवर जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम 31 मे ते 5 जुलै 2024 या कालावधीत होत आहे. त्याअनुषंगाने 24 मे 2024 पासून आदर्श आचार संहिता लागू असल्याने 1 जुलै 2024 रोजी जिल्हा लोकशाही दिनाची अंमलबजावणी होणार नाही, असे प्रसिद्धी पत्रकात कळविले आह

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे