ब्रेकिंग

प्रणव योगसाधना वर्ग तर्फे 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिन साजरा .

नाशिक जनमत.    प्रतिनिधी. प्रणव योगसाधना वर्ग तर्फे 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिन साजरा केला गेला. आज सर्वात मौल्यवान काय असेल तर आपले आरोग्य आणि आरोग्य सांभाळण्यासाठी योगाची खूप गरज आहे. धनसंपदा बरोबर आरोग्य संपदा बरोबर असेल तर अशक्य गोष्ट शक्य होते यामुळेच आज संपूर्ण जग योगाकडे वळलेला आहे.

 

योग साधना वर्ग तर्फे जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून योगा वर्ग घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ओंकार पूजनाने करण्यात आली. त्यानंतर डॉक्टर दिपाली तळेले यांनी ओंकार व गुरुवंदना अशी प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. ह्या योग दिनानिमित्त प्रणव योग साधना वर्गातर्फे अनिता घोलप यांनी योग स्वतः रचुन सादर केले. त्याचबरोबर महिला साधकांनी योग नाटिका सादर करून त्याद्वारे योगाचा प्रचार प्रसार तसेच योगाचे महत्त्व पटवून दिले. वर्गातील महिला व मुलींनी योग आसनांचा अंतर्भाव करून योग नृत्य सादर केले. अतिशय सुंदर असे नृत्य सादरीकरण होते.

 

कार्यक्रमास नाशिक मध्ये योगरत्न प्राप्त झालेल्या सौ. सुचिता गुजराती ज्या ३८ वर्षापासून योग साधनेशी जोडलेल्या आहेत. त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. त्यांच्यासोबत नगरसेविका सौ. हिमगौरी आडके यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले होते. गुजराती ताईंनी स तु दीर्घकाल निरंतर्य सत्कारा सेवितो दुढभूमी या पतंजली मुनींच्या सूत्राप्रमाणे योग साधना करावी असे साधकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर त्या आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा कसा उपयोग करून घेतात हेही त्यांचे अनुभव कथन केले.

सौ हिमगौरी आडके यांनीही योगाचे महत्त्व, झाडांचे महत्त्व, वृक्षारोपणाचे महत्व या विषयांवरती मार्गदर्शन केले आणि प्रणव साधना योग वर्ग येथे चालू असल्यामुळे येथील वातावरण अतिशय पवित्र व शुद्ध झाले आहे असे सांगितले.

त्यानंतर प्रणव योगसाधना वर्गाचे योगशिक्षक अशुतोष पवार यांनी आपण सर्व योगसाधक आपल्या साधनेमध्ये कशी प्रगती करावी याबाबत मार्गदर्शन केले. दुसरे योग शिक्षक प्रवीण पाठक सर यांनी नियमित वर्गावर येणाऱ्या साधकांचे कौतुक केले तसेच इतरही साधकांनी नियमित वर्गावर यावे असे आवाहन केले. या सर्व कार्यक्रमाला डॉक्टर दिपाली तळले यांनी सूत्रसंचालनाने छान गुंफून ठेवले. पवार सरांनी सर्वांचे आभार मानले आणि सौ. ममता पवार यांनी विश्व कल्याण प्रार्थना घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमात यशस्वी करण्यासाठी वर्गातील वरिष्ठ साधक श्री तानाजी वैद्य, अजय तळेले, नितीन पुंड, संजय भाऊ फडोळ, त्याचबरोबर दिपाली तळेले, ममता पवार, अनिता घोलप, प्रांजल फडोळ, सुनिता आंबेकर, ओवी पवार यांनी नाटिका व नृत्याचे नियोजन केले तसेच सादरीकरण केले. श्री नितीन पुंड सरांनी या पूर्ण कार्यक्रमाचे सुंदर फोटो काढून त्याच्या आठवणी जिवंत ठेवल्या. वर्गामध्ये जवळपास ५० साधकांनी योग दिनाचा कार्यक्रम अनुभव घेतला. .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे