ब्रेकिंग

ग्रामीण भागातील अपंग बांधवांची हेडसाल थांबावी. यासाठी सिव्हिल सर्जन यांना निवेदन.

नाशिक जनमत.  मा जिल्हा शल्य चिकित्सक  जिल्हा रुग्णालय नाशिक यांचे कडे दिव्यांग प्रमाणपत्र संकेतस्थळ बंद असल्याने ग्रामीण भागातील दिव्यांगाची हेळसांड थांबवुन दिव्यांग प्रमाणपत्र वाटप सुरळीत करणेबाबत महोदय वरील विषयास अनुसरुन निवेदन देण्यात आले. .1 मे पासून दिव्यांग संकेतस्थळ बंद असल्याने आदिवासी व ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांना पुन्हा परतावे लागत आहे अनेक दिव्यागांना जानेवारी 2024 पासून तपासणी करूनही दिव्यंगगांना प्रमाणपत्र मिळाले नाही. अगोदर दैवाने दिव्यांगतव त्यातुन जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून दिव्य़ांगांची होणारी अवहेलना या मुळे दिव्यांग हतबल झाले आहेत. जिल्हा रुग्णालया कडून दिव्यांगांना कोणतीही सुविधा देण्यात येत नाही दिव्यांग व्यक्तींना जागेवर केस पेपर देणे xरे व इतर चाचण्या एकाच ठिकाणी करणे दिव्यांग कक्ष उभारणे व्हीलचेअर उपलब्ध करणे या विभागातील कर्मचाऱ्यांना दिव्यांगांशी सौजन्याने वागणुक देण्याबाबत सुचना देणे .प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्र तातडीने निकाली काढणे सुलभ दिव्यांग शौचालय सुरू करणे .या सर्व मागण्या तातडीने सोडवुन दिव्यांगांची पिळवणूक थांबवावी .अन्यथा भाजपा दिव्यांग विकास आघाडी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची कुपया जिल्हा

प्रशासनाने नोंद घ्यावी .अशा आशयाचे निवेदन जिल्हा शल्यचिकित्सक चारदत शिंदे साहेबांना देण्यात आले आहे यावेळी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे दिव्याग विकास आघाडीचे जिल्हा सरचिटणीस रंगनाथ दरगुडे शिवाजी शेळके रामदास रौदळ सह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे