राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे प्रदेशाध्यक्ष योगेश्वर सानप योगा चॅलेंज कॉन्टेस्ट स्पर्धेत भारतात प्रथम
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे प्रदेशाध्यक्ष योगेश्वर सानप योगा चॅलेंज कॉन्टेस्ट स्पर्धेत भारतात प्रथम
नाशिक जनमत. सौताडा जिल्हा बीड येथील युवक , राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे प्रदेशाध्यक्ष ( योग आघाडी ) श्री योगेश्वर सानप यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला इंडिया आघाडी टि व्ही चॅनल नी ऑनलाईन योग चॅलेंज कॉन्टेस्ट स्पर्धेमध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळविला.त्याबद्दल योगगुरू रामदेवबाबा महाराज यांनी त्याचे अभिनंदन केले असून सर्व देशभरातून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत.
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे राष्ट्रीय पदाधिकारी श्री. शशीकांत घुगे ( अध्यक्ष ) , तुकाराम सांगळे (सचिव ) , नामदेव सानप ( कार्याध्यक्ष ) , शामराव गिते ( खजिनदार ) , उपाध्यक्ष मायाताई बुरकुल, यांनी हार्दिक अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय जयंती उत्सव समिती चे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब घुगे ( उद्योग आघाडी ), भाऊसाहेब सानप (शेतकरी आघाडी ) , कैलास कराड ( राज्य प्रसिध्दी प्रमुख) , चंद्रकांत धात्रक ( नाशिक विभाग प्रसिध्दी प्रमुख ) ह्या सर्वांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.