महावितरणाच्या डहाळेवाडी विद्युत उपकेंद्राचा आज लोकार्पण सोहळा.

*महावितरणच्या डहाळेवाडी विद्युत उपकेंद्राचा आज लोकार्पण सोहळा*
*ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण*
*त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्राहकांना होणार लाभ*
नाशिक दिनांक: ११ मे २०२२
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत आज गुरुवार १२ मे २०२२ रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणार असून सकाळी ११ वाजता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी येथील ३३/११केव्ही विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण त्यांचे हस्ते होणार आहे.
डहाळेवाडी विद्युत उपकेंद्राचे लोकार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री ना.छगन भुजबळ राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून कृषिमंत्री ना.दादासाहेब भुसे, महाराष्ट्र विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ, केंद्रीय राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार, आमदार हिरामण खोसकर यांचेसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यासोबतच एकलहरे औष्णिक केंद्र येथे ऊर्जामंत्री भेट देणार असून तीनही कंपन्यांतील कार्याचा आढावा घेणार आहेत. डहाळेवाडी उपकेंद्रांमुळे या भागातील ग्राहकांना आणखी योग्य दाबाने व अखंडित वीजपुरवठा मिळणार असून त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये भविष्यात येणारी वीजेची मागणी पुर्ण करण्यास मदत होणार आहे. तरी दहाळेवाडी येथील विद्युत उपकेंद्र लोकार्पण कार्यक्रमाला या भागातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महावितरणने केले आहे.