वनविभागामार्फत वन्यजीव उपचारासाठी अपंगालय सुरू*
*वनविभागामार्फत वन्यजीव उपचारासाठी अपंगालय सुरू*
*नाशिक, दिनांक 31 मे, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा):* पश्चिम भाग, नाशिक वनविभागाकडून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वन्यजीवांवर वेळेत उपचार होण्यासाठी अपंगालय (Transit Treatment Center) उभारले आहे. नाशिक व इतर परिसरातील नागरिक आणि स्वयंसेवी संस्था यांनी ज्या वन्यजीवांना उपचाराची आवश्यकता आहे त्यांना या अपंगालयात उपचारासाठी दाखल करावे, असे आवाहन उपवनसंरक्षक पश्चिम भाग, नाशिक पंकज गर्ग यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
हे अपंगालय चालविण्यासाठी रेक्सू चॅरिटेबल ट्रस्ट, गोखले रोड, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे यांच्याशी 23 फेब्रुवारी 2024 रोजी करार होवून अपंगालय सुरू करण्यात आले आहे.
नाशिक शहर परिसरात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील अनुसूची-1 मधील वन्यजीव बिबट व तत्सम वन्यप्राणी यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अपघात किंवा अन्य कारणांमुळे जखमी झालेल्या वन्यप्राण्यांची संख्या जास्त आहे. तसेच संगमनेर, मालेगांव व अहमदनगर विभागातून सुद्ध जखमी वन्यप्राणी उपचारसाठी येतात. यात अजगर, बिबट, तरस, स्टार प्रजातीची कासवे, गरूड व गिधाड या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. अशा जखमी वन्यप्राणी व पक्षी यांना यापूर्वी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पुणे येथे पाठवावे लागत होते. परंतु आता वेळेत उपचार मिळण्यासाठी नाशिक येथेच अपंगालय (Transit Treatment Center) सुरू करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आ