रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार वितरण* *सोहळा सभा मंडप कामाचा शुभारंभ*
*रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार वितरण*
*सोहळा सभा मंडप कामाचा शुभारंभ*
नाशिक-गोदावरी सेवा समितीतर्फे पहिला रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार थोर राष्ट्रसंत परमपूज्य श्री गोविंददेवगिरी महाराज यांना प्रदान करण्याचा कार्यक्रम 31 मे रोजी सायंकाळी 7:30 वाजता संपन्न होत असून त्याच्या सभा मंडप
उभारणीच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी(दि.28 मे)पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्टचे समन्वयक भक्ती चरणदास महाराज आणि अन्य साधू-महातांच्या हस्ते गंगा घाट( भाजी बाजार) येथे पार पडला.
विश्व मांगल्य सभेचे सभाचार्य तसेच नाथ परंपरेचे 18वे पीठाचार्य आचार्य जितेंद्र महाराज आणि इस्कॉन संचालन समितीच्या गव्हर्निंग बॉडी कमिशनचे सदस्य तसेच इस्कॉनच्या गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग प्रभुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. गोविंददेव गिरीजी महाराज 30 मे रोजीच नाशकात येणार असून त्यांच्या हस्ते गंगा-गोदाची महाआरतीही होणार आहे.
प.पू.गोविंद देवगिरीजी महाराज हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष असून श्रीकृष्ण जन्मभूमी मथुराचे विश्वस्त आहेत.श्रीराम मंदिर उभारणीसाठी त्यांनी अपार कष्ट उपसले.नाशिककरांतर्फे त्यांचा जाहीर सत्कारही होणार आहे.
. कार्यक्रमास बालक दास महाराज,संतोष दास महाराज, गोविंददास महाराज,रामतीर्थ गोदावारी समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी,स्वागत समितीचे स्वागताध्यक्ष धनंजय बेळे,सत्कार समितीचे अध्यक्ष श्रीनिवास लोया,मुकुंद खोचे,वैभव जोशी,नरेंद्र कुलकर्णी, आशिमा केला,वैभव क्षेमकल्याणी,विजय भाताबरेकर,शिवाजी बोंदार्डे,प्रेरणा बेळे,रणजित सिंग आनंद,नाशिक वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी,विजय जोशी,रामेश्वर मलानी,उदयन दीक्षित,राजेंद्रनाना फड,राजेंद्र वडनेरे आदी उपस्थित होते