राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालीलक लातूर सामना बरोबरीत हुजैफ शेख व व्यंकटेश बेहरे ची शतकी भागीदारी
राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालीलक लातूर सामना बरोबरीत
हुजैफ शेख व व्यंकटेश बेहरे ची शतकी भागीदारी
पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटीच्या अनिर्णित सामन्यात नाशिक व लातूर यांची पहिल्या डावातील धावसंख्या सारख्याच झाल्याने समान गुण मिळाले. हुजैफ शेख व व्यंकटेश बेहरे यांनी नवव्या गड्यासाठी शतकी भागीदारी करत लातूरला आघाडी घेण्यापासून रोखले.
नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना लातूरने सर्वबाद २७७ धावा केल्या. नाशिकच्या कृष्णा केदार व विवेक यादवने प्रत्येकी ३ तर हुजैफ शेख व समकीत सुराणाने प्रत्येकी २ बळी घेतले. उत्तरादाखल नाशिकच्या कर्णधार प्रसाद दिंडे ६२ व रोहित पुरोहितच्या ४५ धावांमुळे नाशिकने ८ बाद १५५ इतकी मजल मारली. संघ अजूनही १२२ धावांनी मागे असताना हुजैफ शेख ६२ व व्यंकटेश बेहरे ४८ यांनी नवव्या गड्यासाठी १०३ धावांची भागीदारी करत ९ बाद २५८ पर्यंत मजल मारली. त्यानंतर व्यंकटेश बेहरेने विवेक यादवच्या साथीने १९ धावांची भागीदारी करत, २७७ धावा करत पहिल्या डावात लातूरशी बरोबरी साधली.