ब्रेकिंग

नाशिक ग्रेप हार्वेस्ट महोत्सव-2024;* *24 व 25 फेब्रुवारी रोजी आयोजन*        *: मधुमती सरदेसाई*

 

*नाशिक ग्रेप हार्वेस्ट महोत्सव-2024;*

*24 व 25 फेब्रुवारी रोजी आयोजन*

*: मधुमती सरदेसाई*

नाशिक, दिनांक : 20 फेब्रुवारी, 2024 वृत्तसेवा) : उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक यांच्या मार्फत 24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी हॉटेल एमराल्ड पार्क (ग्रीन व्ह्यु हॉटेल) येथे नाशिक ग्रेप हार्वेस्ट महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका मधुमती सरदेसाई यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देवून उद्योगांना चालना देण्यात येते. तसेच या महोत्सवात ताजी द्राक्ष खरेदी करण्यासह द्राक्ष बागांना भेटी देवून काही प्रसिद्ध वायनरीना भेट देता येणार आहे. ग्रेप हार्वेस्ट महोत्सवात द्राक्ष शेती, द्राक्ष हार्वेस्टिंग (काढणे), द्राक्षांच्या विविध जाती, आधुनिक पद्धतीने द्राक्ष व्यवस्थापन तसेच पॅकेजिंग बघता येणार आहे. यासोबत द्राक्षावर प्रोसेसिंग करून तयार केलेले विविध पेय व विविध खाद्य पदार्थ चाखण्याची संधी देखील यावेळी मिळणार आहे. द्राक्ष खरेदीसह आकर्षक खेळ आणि लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टचेही आयोजन करण्यात आले आहे.

*टूर नंबर १: २४ फेब्रुवारी २०२४ :* हॉटेल एमराल्ड पार्क (एकत्रीकरण) सुरूवात सकाळी ८ वाजता बसवंत हनी बी पार्क (निसर्ग उत्सव), लोणवाडी – चोपडे ग्रेप पॅकिंग हाऊस, निफा वायनरी टूर (कृषी पर्यटन केंद्र / हार्वेस्टिंग)

 

*टूर नंबर २ : २५ फेब्रुवारी २०२४ :* हॉटेल एमराल्ड पार्क (एकत्रीकरण) सुरूवात स. ८ वाजता सह्याद्री फार्म (फार्मर प्रोड्युसर कंपनी)- ऍग्रो प्रोसेसिंग युनिट – मोएत शेंदोन विनयार्ड टूर

महोत्सवासंबंधी अधिक माहितीसाठी ९८९००१११२०, ०९८९०४०४२५३, ९८२२४३९०५१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर व ddtourism.nashik-mh@gov.in या ईमेल आणि www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे