ब्रेकिंग
जिल्हा माहिती अधिकारीपदी संप्रदा बीडकर रूजू*

*जिल्हा माहिती अधिकारीपदी संप्रदा बीडकर रूजू*
*नाशिक, दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 नाशिक जनमत वृत्तसेवा):*
नाशिक जिल्हा माहिती अधिकारीपदी नियुक्त संप्रदा बीडकर यांनी आज जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार तत्कालीन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्याकडून स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक किरण डोळस यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते
नाशिकला येण्यापूर्वी श्रीमती बीडकर सांगली येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूर, बीड, सोलापूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तर डहाणू येथे माहिती अधिकारी पदावर सेवा बजावली आहे. त्यांना प्रिन्ट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील कामाचा अनुभव आहे.