सातपूरला वाहनाच्या काचा फोडणाऱ्या पाच जणांची त्याच भागातून धिड.

नाशिक जनमत. गंगापूर गावाजवळील वाणी फोडण्याची घटना ताजी असतानाच परवा दिनांक 18 रोजी पहाटे चार वाजे दरम्यान सातपूर परिसरातील सात माऊली चौकात काही युवकांनी दहशत पसरवत वाहनांच्या काचा फोडल्या दरम्यान सातपूर पोलिसांनी काही वेळातच चार चाकी वाहनाच्या काचा फोडणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. सागर हुळनोर. सुधीर भालेराव .ऋषिकेश उर्फ संकेत पवार. दीपक अहिरे मिलिंद मुंडे. सर्व राहणार श्रमिक नगर यांना पोलिसांनी अटक करून त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे नागरिकांना भीती कमी होण्यासाठी सातपूर पोलिसांनी ज्या ठिकाणी या युवकांनी दहशत पसरवली होती त्या परिसरामध्ये संशययाता ची धीड काढली. नाशिक शहरामध्ये पोलिसांचा धाक कमी झाल्याने नाशिक शहर आसुरक्षित शहर म्हणून ओळख होऊ लागली
आहे कधी खूणाच्या घटना. तर कधी . टोळक्यात हाणामारी. घरभोडी. गाड्या फोडणे अशा घटना मोठ्या प्रमाणात घडू लागले आहे. लोकसभा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी गस्त वाढवणे गरजेचे झाले आहे.