विनू मंकड स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजयात साहिल पारखचे घणाघाती शतक केवळ ७८ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह ११० धावा .
विनू मंकड स्पर्धेतील महाराष्ट्राच्या विजयात
साहिल पारखचे घणाघाती शतक
केवळ ७८ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह ११० धावा
नाशिकच्या डावखुरा सलामीवीर फलंदाज साहिल पारख याने बी सी सी आय च्या विनू मंकड करंडक स्पर्धेत बंगाल विरुद्ध केवळ ७८ चेंडूत ८ चौकार व ७ षटकारांसह ११० धावा फटकावत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या विजयांत मोठा वाटा उचलला. त्यानंतर प्रतीक तिवारीच्या भेदक गोलंदाजीनेही ३ बळी घेतले.
विजयवाडा येथे महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद ३५१ धावा केल्या. साहिल पारख पाठोपाठ दिग्विजय पाटीलनेही शतक झळकवले. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १५१ धावांची मोठी भागीदारी केली. उत्तरादाखल बंगाल संघ ३१ षटकांत सर्वबाद १२२ पर्यंतच मजल मारू शकला .नाशिककर साहिल पारखच्या ११० धावानंतर, प्रतीक तिवारीनेही ३ बळी घेतले.
महाराष्ट्राचा पुढील सामना – १८ ऑक्टोबर – उत्तराखंड.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साहिल व प्रतीकचे अभिनंदन करून यापुढील स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
साहिल पारख व प्रतीक तिवारीचे छायाचित्र सोबत पाठवीत आहे.
धन्यवाद.
समीर रकटे
सेक्रेटरी,
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन.