क्रिडा व मनोरंजन

एन डी सी ए प्रोफेशनल लीग प्रो जंबो व ए बी ११ विजयी

:

 

एन डी सी ए प्रोफेशनल लीग

 

प्रो जंबो व ए बी ११ विजयी

 

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, एन डी सी ए प्रोफेशनल लीग २०२३ -२४ स्पर्धेत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर प्रो जंबो व ए बी ११ विजयी विजयी झाले .

 

तिसऱ्या सामन्यात प्रो जंबो ने नित्यम केटरीओचा ३६ धावांनी पराभव केला . प्रथम फलंदाजी करत प्रो जंबो ने २० षटकांत ७ बाद २१७ धावा केल्या , हर्षल साळुंके ने सर्वाधिक ७७ धावा केल्या. प्रो जंबो संघातर्फे महाराष्ट्र शासनाचे समाजकल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सहभाग नोंदविला. त्यांनी १२ चेंडूत ५ धावा केल्या. प्रो जंबो ने नंतर नित्यम केटरीओला १८.४ षटकांत १८१ धावांत सर्वबाद करून सामना जिंकला . नित्यम केटरीओच्या राहुल पाटील ने ६० धावा केल्या.

 

तर चौथ्या सामन्यात ए बी ११ ने मराठा वॉरीअर्सचा ४ गडी राखून पराभव केला . प्रथम फलंदाजी करत मराठा वॉरीअर्सने २० षटकांत ७ बाद

१५७ धावा केल्या . ब्रिजमोहन लोंगणीने ४२ धावा केल्या . ए बी ११ ने १९.३ षटकांत ६ बाद १५२ धावा करत सामना जिंकला .नीलेश ठाकूर ने ४० तर नितीन धात्रकने ३७ धावा केल्या.

 

नाशिकमधील ६ संघांत , एन डी सी ए च्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे सदर स्पर्धा ७ ते २६ ऑक्टोबर दरम्यान रंगत आहे.

नाशिक मधील डॉक्टर्स ,आर्किटेक्टस, सीए, वकील ,बिल्डर्स ,इंजिनिअर्स ,उद्योजक , व्यावसायिक असे विविध प्रोफेशन मध्ये काम करणारे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सर्व संघ राऊंड रॉबिन पद्धतीने इतर पाच संघांशी साखळी सामने खेळणार आहेत .

सर्व क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर म्हणजे या स्पर्धेचे थेट – live – प्रक्षेपण स्पोर्टवोट, मुंबई तर्फे करण्यात येत आहे. स्पोर्टवोट हे अँप डाउनलोड करून हजारो क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा थेट आनंद घेता येईल . मागील हंगामात स्पोर्टवोटच्या थेट प्रक्षेपणाने सुवर्ण महोत्सवी वर्षात , एन डी सी ए चा ऐतिहासिक डिजिटल अध्याय सुरु झाला व हजारो क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा थेट आनंद घेतला. तसाच या एन डी सी ए प्रोफेशनल लीग स्पर्धेचाही सर्वांनी आनंद घ्यावा असे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटने तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे