ब्रेकिंग

पुण्यात अपघाताचा थरार; मद्यधुंद वाहनचालकाने अनेकांना उडवले,एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी.

संग्रहित दृश्य

नाशिक जनमत  रात्रीच्या वेळी मध्यपान करत चार चाकी गाडी बेजाबाबदारपणे चालवत असल्याने अनेक घटनांमध्ये वाढ झाली आहे काल रात्री पुणे येथील घटनेमध्ये देखील अनेक जण जखमी झाले आहेत. पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ  भरधाव चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवल्याची  घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता केळकर रस्त्यावर  घडली. यामध्ये दोन ते तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक देत स्वतः एका पोलला जाऊन धडकला. या घटनेवरुन पुणे शहरवासींना शुक्रवारी रात्री २०१२ मध्ये घडलेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण आली.

 

 

 

 

 

 

पुण्यातील उमेश हनुमंत वाघमारे आणि नटराज बाबुराव सूर्यवंशी हे दोघे शुक्रवारी रात्री चार चाकी वाहनाने नारायण पेठ पोलीस चौककडून झेड ब्रिजकडे जात होते. दोघांनी मद्य प्राशन केले होते. नदी पात्रापासून अलका चौकच्या मार्गावर गाडी आणली असताना बेफाम वेगात चारचाकी अलका चौकाच्या दिशेने घेऊन जात होते.

 

 

त्यादरम्यान गाडीवरचा त्यांचा ताबा सुटला आणि रस्त्यावर जात असणाऱ्या विश्वनाथ उपादे यांना उडवले. त्यानंतर त्यांनी दोन दुचाकींना धडक दिली. पॅसेंजर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली. शेवटी एका लाईटच्या पोलाला जाऊन धडकला. यामध्ये पायी चालत जाणाऱ्या विश्वनाथ उपादे यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन ते तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

 

या घटनेनंतर केळकर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. प्रक्षुब्ध जमावाने कारवर हल्ला करून कारचालकाला मारहाण केली. विश्रामबाग पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहे.

 

अपघाताने संतोष मानेची आठवण

 

पुण्यात २०१२ साली संतोष माने प्रकरण घडले होते. २५ जानेवारी २०१२ मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत मनोरुग्ण असेल्या संतोष मानेने ९ जणांना चिरडले होते. तर या दुर्घटनेत ३७ जण जखमी झाले होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे