१९ वर्षांखालील महाराष्ट्र वि सौराष्ट्र विजयात साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी प्रभावी
१९ वर्षांखालील महाराष्ट्र वि सौराष्ट्र
विजयात साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी प्रभावी
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे साहिल पारख , रोहन शेडगे व प्रतीक तिवारी यांनी १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या सौराष्ट्र संघावरील विजयात प्रभावी कामगिरी केली . राजकोट येथे झालेल्या एकदिवसीय सराव सामन्यात महाराष्ट्र संघाने सौराष्ट्रचा , ७ गडी राखून मोठा पराभव केला .
नाशिकच्या डावखुरा जलदगती गोलंदाज रोहन शेडगे व डावखुरा फिरकीपटू प्रतीक तिवारी यांनी प्रत्येकी २ बळी घेत सौराष्ट्र संघाला ४८ षटकांत १८० धावांत सर्वबाद केले. सोहन जमालेने ३ गडी बाद केले. विजयासाठी १८१ धावांचा पाठलाग करताना , साहिल पारखने नाबाद ४२ धावा केल्या. साहिलने ३ बाद ६५ वरुन दिग्विजय पाटील ( नाबाद ८८ ) बरोबर महत्वपूर्ण भागीदारी करत महाराष्ट्र संघाला २९ षटकांत महाराष्ट्र संघाला ७ गडी राखून विजयी केले .
: