वन भोजनाचे औचित्य साधत स्वच्छता अभियान.
वन भोजनाचे औचित्य साधत स्वच्छता अभियान
अरुण हिंगमिरे पत्रकार जातेगांव
. नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा गुरुवारी येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पिनाकेश्वर मंदिर या ठिकाणी वनभोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी येथे श्रावण महिनाभर महादेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येवून गेल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लाष्टीक आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडला असल्याचे दिसून आले. वन विभागाच्या या डोंगर परिसरात गुरे, मेंढ्या, बकर्या चरण्यासाठी जात असल्याने कळत न कळत त्यांच्या पोटात प्लाष्टीक जावून त्यांच्या जीवितास हानी होवू नये हा उद्देश नजरेसमोर ठेवून विद्यार्थ्यांनी बहुतांश प्लाष्टीक आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या ठिकठिकाणी गोळा करून ते नष्ट केले.
मुख्याध्यापक डी.वाय.चव्हाण यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वनभोजनचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते दुपारी एक वाजेला सर्व विद्यार्थी पिनाकेश्वर मंदिरात दर्शनासाठी हजर झाले होते. नंतर विद्यार्थ्यांनी विश्रांती घेतली. मंदिराच्या परिसरामध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी कार्तिकी यादव हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हटला. तसेच घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण आणि कृष्णा माझ्याकडे पाहू नको रे माझी घागर गेली फुटून या गवळणी तिने उत्कृष्टरित्या त्या ठिकाणी सादर केल्या तसेच शुभांगी शिंदे हिने विठ्ठलाचे एक भक्ती गीत म्हटलं, विद्यार्थी वैभव शिंदे याने एक अभंग सादर केला तसेच विद्यालयातील मराठी विषयाचे शिक्षक करवर पी.ई. यांनी खरंच बाई माझ्या ग दुधात नाही पाणी ही गवळण सादर केली यावेळी जेऊर गावाचे बाबाजींचे भक्त भानुदास पवार यांनी बाबाजींचे पद म्हटले या सर्वांचे देवस्थान ट्रस्टच्या वतीने पंढरीनाथ पवार यांनी शाॅल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच जनता
विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.वाय.चव्हाण यांनी जनार्दन स्वामी यांच्या कार्याचा परिचय करून विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले.
यावेळीसर्व विद्यार्थ्यांनी मंदिर परिसरातील स्वच्छता ही केली. वनभोजन यशस्वीतेसाठी माननीय मुख्याध्यापक चव्हाण, वाय. पी.चव्हाण, के.डी चोळके, पी.यु.पाटील,ए.टी अहिरे, एन के.मोरे,एन पी.पाटील,आर जे सदगीर,एम.आर. दानी, पी ई. करवर, ए.ए. गरुड, एन. व्ही. बच्छाव, युवराज काळे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी सरोदे, आप्पा सोनवणे, सुमित पाटील, राहुल निकम, गणेश अहिरे यांनी अथक परिश्रम घेतले.