अंबड येथील भंगार बाजाराच्या गोदामास आग. वीस लाखाचे नुकसान झाल्याची भीती.
गोदामास आग; 20 लाखांचे नुकसान
नाशिक जनमत चंद्रकांत धात्रक यांच्याकडून अंबड सातपूर लिंग रोडवरील भंगार बाजारात मागील काही दिवसांमध्ये अनेकदा आगीच्या घटना घडलेल्या आहेत हा भाग दिवसेंदिवस संवेदनाशील बनत चालला आहे काल देखील सातपूर-अंबड लिंकरोडवरील आझादनगर येथील प्लॅस्टिक भंगाराच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना काम करत आग लागण्यास कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून रामचरण चव्हाण, वसीम मन्सुरी यांच्यावर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदामात गॅस कटरद्वारे लोखंडी भाग तोडण्यात येत असताना कटरची ठिणगी उडाल्याने प्लास्टिला व त्यानंतर फोमच्या सोफ्याला आग लागली.
आझादनगर खाडी परिसरात भंगार मालाचे दोन गोदाम आहेत. त्यातील एका गोदामात लोखंड भंगार तोडण्याचे काम केले जाते तर दुसऱ्या गोदामात प्लास्टिकचे दाने बनविण्याचे काम चालते. रविवारी साडे दहाच्या सुमारासस लोखंडाच्या गोडाऊनमध्ये लोखंडाचे भाग गॅस कटरने तोडण्याचे काम सुरू होते. याच वेळेस गॅस कटरची ठिणगी जवळील प्लास्टिकवर पडली व त्याशेजारील फोमच्या सोफ्याला आग लागल्याने आग मोठ्या प्रमाणात वाढली या घटनेनंतर अंबड पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमनचे विभागीय अधिकारी ए. सी. मांगलकर, एस. एस. खुळे आदींच्या पथकाने धाव घेतली. भंगार मालकांनी कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देत तसेच आग लागल्यास आग विझवण्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा वस्तू जवळ ठेवाव्यात व काळजी घ्यावी असे नागरिक बोलत आहे आग लागली असता मोठ्या प्रमाणामध्ये आकाश मध्ये काळा धूर पसरला होता अग्निशामक दराच्या सातबंबानी ही आग विझवली