कासलीवाल विद्यालयात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती,राखी बनविण्याबाबत कार्यशाळा

कासलीवाल विद्यालयात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती,राखी बनविण्याबाबत कार्यशाळा
अरुण हिंगमिरे पत्रकार जातेगांव नांदगाव
दिनांक-23 ऑगस्ट 2023. नाशिक जनमत प्रतिनिधी
मुलांमध्ये अनेक सुप्त गुण असतात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व निसर्गाशी नाते घट्ट व्हावे या उद्देशाने नांदगाव येथील सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयात
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविणे,रक्षाबंधन निमित्त राखी बनविणे कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल चे कला शिक्षक नीलेश पाटील यांनी स्वत: उपस्थित राहून मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ति कशी बनवावी हे प्रात्यक्षिकासह करून दाखविले.याप्रसंगी नीलेश पाटील यांचा मुख्याध्यापक शरद पवार यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अतिशय सुंदर पर्यावरणपूरक राखी व अतिशय सुबक गणेश मूर्ती बनवल्या.
या प्रसंगी मुलांमध्ये उत्साह दिसून आला.सदर कार्यशाळेचे आयोजन शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक शरद पवार यांनी केले होते.
संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल तसेच सेक्रेटरी विजय चोपडा प्रशासन अधिकारी गुप्ता सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यालयातील शिक्षक गोरख डफाळ, संजय शिवदे ,राहूल आहेर ,विजय जाधव,मनोज साळुंखे,केतन दळवे, मनोज व्हरगीर, हर्षदा भालेराव , रुपाली मालकर ,योगीता गायकवाड ,जयश्री चोळके,वर्षा पाटील,सोनाली बोडके2023 यांनी कार्यशाळा यशस्वी व्हावी म्हणून विशेष मेहनत घेतली
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक संदीप आहेर यांनी संजय शिवदे यांनी आभार व्यक्त केले.