नाशिक येथील मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ*
*नाशिक येथील मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ*
*नाशिक दि. 01 सप्टेबर , 2023 नाशिक जनमत वृत्तसेवा):*
नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, पुणे यांचेमार्फत 75 विद्यार्थिंनी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपुर यांचेमार्फत 75 विद्यार्थिंनी व उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत 50 विद्यार्थिंनी अशाप्रकारे एकूण 200 विद्यार्थिंनींच्या वसतिगृह प्रवेशासाठी 15 सप्टेंबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.2) नाशिक सीमा अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित गटातील विद्यार्थिंनींनी वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी https://sarthi-maharashtragov.in या संकेतस्थळावर तसेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गांच्या विद्यार्थिंनींनी https://mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत.
सारथी व महाज्योतीचे संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यास 15 सप्टेंबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून व त्यासोबत आधारकार्ड, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुकाची पहिल्या पानाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड, शैक्षणिक शुल्य भरल्याची पावती इत्यादी आवश्यक कागदपत्रे स्वसाक्षांकित करून सदर अर्ज सारथी विभागीय कार्यालय, बँरेक नंबर 8, विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक येथे जमा करावेत. असे सीमा अहिरे, उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र.2) नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.