अंबडच्या समाज मंदिर जवळ असलेल्या मंदिरचया आवरत युवकाचा खून.

नाशिक जनमत नाशिक मधील नवीन सिडको परिसरात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाही मागील आठ दिवसापूर्वीच संजीव नगर भागात दोन युवकांचे खून झाले होते. दरम्यान आज दुपारी दोन ते अडीच दरम्यान मयूर केशव दातीर वय 22 यांचा अंबडच्या स्वामी नगरातील समाज मंदिर परिसरामध्ये खून करण्यात आला.जुन्या भानगडी तून हा खून पूर्ववैमनस्यातून झाला
असल्याचे बोलले जात आहे. खून करणारा युवक देखील गुन्हेगारी वृत्तीचा होता त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा अंबड परिसर दहशतीखाली आलेला आहे. घटनास्थळावर मयत युवकाचे मोटरसायकल आढळून आलेले आहे तिच्यावर रक्ताचे डाग पडलेले आहेत. धारदार शस्त्राने हा खून करण्यात आला. घटनास्थळावर अंबड पोलीस तसेच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद वाघ हजर झाले होते अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पोलिसांचा धाक कमी झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.