महाराष्ट्र

मनमाड विभागाचे पोलीस उपाधिक्षक समीर सिह साळवे राष्ट्रपती शौर्य पथकाने सन्मानित.

नाशिक जनमत . मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक समिर र्सिंह साळवे यांना राष्ट्रपती शौर्य पोलीस पथकाने सन्मानित करण्यात आले सोमवारी दुपारी मुंबईत राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी साळवे यांचा पदक बहाल करत गौरव केला जिल्हा पोलीस उपाधीक्षक समीर साळवे यांना 2020 मध्ये राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले होते गडचिरोली भागात त्यांनी तीन वर्ष कार्यरत असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी नक्षल विरोधी अभियान योग्य प्रकारे राबवले होते छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवरील या घनदाट जंगलात दोघा नक्षलवाद्यांचा त्यांनी खात्मा केला होता वयाच्या 27 व्या वर्षी केलेल्या इन काउंटर धाडसी कामगिरीची दखल घेत साठी राष्ट्रपती शौर्य पदासाठी निवड झाली होती तीन वर्षापासून मनमाड विभागाची यशस्वी कामगिरी व कार्यभार सांभाळणारे साळवे पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित झालेले आहेत साळवे यांच्या सन्मानाचे पोलिस दलातून कौतुक केले जात आहे एक जिगरबाज व प्रामाणिक व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची मनमाड व नाशिक जिल्ह्यामध्ये ओळख आहे. नाशिक जंनमत तर्फे समीर साळवे सरांचे खूप खूप .अभिनंदन

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे