आदिवासी महिलांचे प्रश्न मार्गी लागणार : सौ.अंजुमताई कांदे*

*आदिवासी महिलांचे प्रश्न मार्गी लागणार : सौ.अंजुमताई कांदे*
अरुण हिंगमिरे
पत्रकार नांदगाव नाशिक”
नांदगाव तालुक्यातील गिरणा नगर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीवरील महिला, समाज बांधव विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले असल्याचे समजताच. आ. सुहास अण्णा कांदे यांच्या पत्नी सौ.अंजुमताई सुहास कांदे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली, व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
व आदिवासी महिलांच्या देखील विविध अडचणी समजून घेतल्या, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून सर्व समस्यांवर त्वरित सोडवल्या जातील असे सांगितले. या वेळी गटविकास अधिकारी गणेश चौधरी, विस्तार अधिकारी मांडवडे उपस्थित होते. आदिवासी वस्तीवर घरकुल, शौचालय, पिण्याचे पाणी, तसेच शासकीय कागदपत्रांच्या विविध अडचणीं बाबत उपस्थितांनी समस्या मांडल्या यावेळी ताईंनी त्वरित पाण्याचे टँकर पाठवण्याचे सांगितले त्याचप्रमाणे वस्तीसाठी शौचालयची व्यावस्था करणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांनी शबरी घरकुल योजने अंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.
अनेक आदिवासी कुटुंबियांना रेशन कार्ड, जातीचे दाखले तसेच विविध कागदपत्रं नाहीत किंवा अडचणी आहेत त्यांना सर्वांना मोफत शासकीय सुविधा अंतर्गत आमदार संपर्क कार्यालयातून सर्व मदत केली जाणार आहे आणि त्यासाठी सर्वांना कागदपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत तसेच लवकरच मोफत दवाखाना व मोफत शासकीय सुविधा कॅम्प आयोजित करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी उपस्थित महिला आणि उपस्थित ग्रामस्थ व उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या बद्दल ताईंचे आभार मानले.