मंगलरूप गोशाळेचा नासिक प्राणी मित्रांकडून गौरव

मंगलरूप गोशाळेचा नासिक प्राणी मित्रांकडून गौरव
नाशिक जनमत राजस्थान कडून बंगलोर कडे कत्तलखान्यात 111 नेली जात होती. त्यांचे प्राण मंगल रूप गोशाळेच्या पुरुषोत्तम आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचवले .आज सर्व उंट नाशिकच्या पांजरपोळ संस्थेत सुखरूप आहेत व त्यांचे देखभाल व वैद्यकीय उपचार डॉक्टर प्रकाश झांबरे यांच्या देखरेखित सुरू आहेत. ह्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी नासिक प्राणी मित्रांनी सोमेश्वर येथील खुला रंगमंच येथे सर्व गो – सेवकांचा यथोचित सत्कार केला . मुख्य अतिथी म्हणून किशोरजी माने ,संतोष गायकवाड उपस्थित होते .नगरसेवक संतोष गायकवाड यांनी आपल्या भाषणात भविष्यात प्राणी प्रेमींना कोणतीही मदत लागल्यास करण्याची तयारी दाखवली . किशोरजी माने यांनी मंगल रोपला नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून धान्य देण्याचे आश्वासन दिले.
गरुड झेप प्रतिष्ठानचे डॉ संदीप भानोसे यांनी पुरुषोत्तम आव्हाड यांचे कौतुक केले तसेच पांजरपोळ संस्थेचे आभार मानले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोयरा वैद्य यांनी केले.
मंगलरूप गोशाळेचे तरुण तडफदार कार्यकर्ते पुरुषोत्तम आव्हाड ,चंदन भास्करे, सागर आगळे ,प्रथमेश चौधरी, गजू घोडके ,आदित्य माळी, हर्षल साळुंखे ,दुर्गेश चौधरी यांचा नासिक मधील प्राणी मित्रांकडून यथोचित गौरव करण्यात आला.
आनंदवल्ली येथील सुपरिचित नगरसेवक संतोष भाऊ गायकवाड , नासिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोरजी माने , प्रवीण कोकाटे ,अरुण निकम ,अविनाश येवलेकर ,तृप्तीदा काटकर ,माधवराव पवार ,सायबर सिक्युरिटी तज्ञ सोयरा वैद्य ,प्राणी मित्र डॉ वर्षा चित्तेवाड, स्वप्ना परदेशी, माधुरी पवार ,गरुड झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संदीप भानोसे व इतर उपस्थित होते.