ध्यानाने होते आत्म्याची ओळख. डॉक्टर तुळशीराम गुट्टे
ध्यानाने होते आत्म्याचीओळख
डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे : प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे कार्यक्रम
नाशिकः प्रतिनिधी
ओम पासून शांती मिळते. परमपिता एकच असून नाव वेगळे आहेत. ध्यानाने आत्म्याची ओळख होत असून मन देखील सुदृढ होत असल्याचे विचार संत साहित्याचे अभ्यासक तथा श्री सिध्दी विनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ तुळशीराम महाराज गुट्टे यांनी व्यक्त केले.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे म्हसरूळ येथील मुख्य केंद्रात मानसिक विकारांच्या विषयांबाबत जनजागृतीच्या उद्देशाने राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.
स्वामी डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, मानसोपचार तज्ञ डॉ.नकुल वंजारी,, कादवा साखर कारखान्याचे संचालक सुनील केदार, ब्रह्माकुमारी पुष्पादिदी, ब्रह्माकुमारी पुनमदिदी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. गुट्टे महाराज म्हणाले की, देवाचे राशी नाव मौन आहे. जेवढे मौनात राहणार तेवढे भगवंताची अनुभूती लवकर येईल. त्यामुळे जास्तीत जास्त मौनात रहा. आपले मनच आपले पहिले गुरू आहे. त्यामुळे ध्यानाने मनाला सुदृढ करा असे आवाहन डॉ गुट्टे महाराज यांनी केले.
मानसोपचार तज्ञ डॉ.नकुल वंजारी यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व विशद केले. मनुष्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य एकमेकांशी निगडीत आहे. शारीरिक आरोग्य ढासळते , तेव्हा माणूस मनाने खचतो आणि मानसिक व्याधीचा बळी ठरतो .कादवा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपचे सरचिटणीस सुनील केदार यांनी केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली.ब्रह्माकुमारी संस्थेच्या जिल्हा मुख्य संचालिका राज योगिनी ब्रह्मा कुमारी वासंतीदीदी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये कोविड-19 महामारीचे दुष्परिणाम सर्वांनीच अनुभवले आहेत.या महामारीने लोकांमध्ये अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्यविषयक विकारांना जन्म दिला असून तो दूर करण्यासाठी ताण-तणाव रहित जीवन आनंदी जगण्यासाठी ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात विनामूल्य प्रवेश घेऊन सात दिवसाचा कोर्स करून घ्यावा असे सांगितले.यावेळी स्वागत व प्रास्ताविक ब्रह्माकुमारी पुष्पादीदी यांनी तर सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनमदीदी यांनी केले.व ब्रह्माकुमारी ज्योतीदीदी यांनी आभार मानले. कार्यक्रमास राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, साहेबराव पगारे ,मनोहर तांबे,रमेश बोरसे,राजेंद्र शिंदे,ब्रह्मकुमार विपुलभाई, गिरीश शिंपी,जयवंत महाले,ब्रह्माकुमारी रवीनादीदी,लक्ष्मीमाता,पुनमबहेन,रजनीमाता आदींसह मोठ्या संख्येने साधक बंधू-भगिनी उपस्थित होते.