सातपूर मधे वडिलांन सह दोन तरुण मुलांनी केल्या आत्महत्या. पोलिस तपास चालू.

नाशिक जनमत. काल सकाळी अकरा वाजता सातपूरच्या राधाकृष्ण नगर परिसरात राहणाऱ्या शिरोडे कुटुंबातील वडील व दोन तरुण मुलांनी ग ळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले
आहे या प्रकारामुळे सातपूर परिसरात चर्चेला उधाण आले आहे. पत्नी मंदिरात गेली असता घरामध्ये गळफास घेऊन तिघांनी जीवन संपवले पत्नी मंदिरातून घरी आले असता आतून दरवाजा बंद असल्याने आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नव्हता दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांना कळविले असता त्यांनी दरवाजा उघडला असता घरा मध्ये. दीपक शिरोडे वडील वय 55 प्रसाद शिरोडे वय 25 व राकेश शिरोडे वय 23 यांनी घरातल्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले आहे. घटनास्थळावर पोलिसांचा फोज फाटा
हजर झाला होता परिसरांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली होती. पोलीस सूत्रानुसार घरामध्ये एक चिठ्ठी मिळून आली त्यामध्ये सावकाराच्या जाचा मुळे आत्महत्या केल्याचे उघडेस असल्याचे नमूद केले आहे. 70 लाखाच्या कर्जामध्ये 31 लाख रुपये कर्ज हे सावकारी होते सावकारांचा वसुलीसाठी फोन येत असल्याने जीवन संपवल्याचे दिसून येत आहे. शिरोडे कुटुंब हे मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी असून नासिक मध्ये वास्तव्यासाठी आले होते राधाकृष्ण नगर परिसरातील पोलीस चौकी समोर आशापुरा निवास या घरात ते राहत होते. वदिल दीपक शिरोडे हे अशोक नगर चा शेवटचा बस स्टॉप येथे फळ विक्री व्यवसाय करत होते तर त्यांची मुले प्रसाद व राकेश चार चाकी वाहनावर फळ विक्रीचे व्यवसाय करत असे आर्थिक स्थिती हलक्याची असल्याने कर्जबाजारी झाले होते त्यामुळे ते काही दिवसापासून निराश राहत होते काल सकाळी शीरोटे कुटुंबाच्या घरात आनंद वार्ता आली होती प्रसाद शिरोडे यांच्या पत्नी
मुलगी झाली होती व घरात लक्ष्मीची आगमन झाले असे सर्वांनी परिसरामध्ये सांगितले होते आनंदाच्या वातावरणातच अशी घटना घडल्याने सातपूर परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सातपूर पोलीस तपास करत असून सुसाईड नोट वरून 22 संशयितअसून 14 जणांना ताब्यात घेतले असून पोलीस तपास चालू आहे. दरम्यान आत्महत्यांच्या घटना वाढती महागाई. तसेच व्यवसायामध्ये नफा कमी व खर्च जास्त होत असल्याने नेराआश्य निर्माण होते. गरजा पूर्ण करण्यासाठी सावकारी कर्ज उचलले जाते. व त्यातून आत्महत्या होत असल्याच्या घटना घडत आहेत. मागील एक महिन्यापूर्वी देखील पती-पत्नी ने आत्महत्या केल्याची घटना घडली होती .सातपूर पोलीस तपास करत आहे