ट्रक आणि लक्झरी बस मध्ये अपघात दहा साई भक्तांचा मृत्यू.
नाशिक जनमत प्रतिनिधी आज सकाळी पहाटे चार ते पाचच्या दरम्यान ट्रक आणि लक्झरी बस च सा अपघात झाला. यामध्ये दहा जण जागीच मृत्यू पावल्याची घटना घडल्याची सूत्राची माहिती मिळत आहे. सिन्नर शिर्डी रोडवरील पाथर्डी गावाजवळ रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे एकाच रस्त्यावर डबल वाहतूक चालू असल्याची कळते समोरून येणारी ट्रक व लक्झरी बस यांच्यामध्ये दोन्ही वाहनांमधील अंतराचा अंदाज न आल्याने ट्रक व लक्झरी एकमेकावर आढळल्या या दोन्ही वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पहाटेची वेळ असल्याने अनेक बसमधील प्रवासी गार झोपेत होते घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये बसमधील भावी व प्रवासी वाचवा व वाचवा म्हणून आक्रोश करत होते. स्थानिक रहिवासी व शालेय विद्यार्थ्यांनी बस चया काचा फोडून. अनेक प्रवाशांना बाहेर काढले व उपचारासाठी सिन्नर येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे दहा जण ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तर सतरा जण जखमी असल्याची वृत्त हाती आले आहे यामध्ये सात जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे सिन्नर शिर्डी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.