मकर संक्रात विषयी थोडक्यात माहिती. प्रवीण देशपांडे गुरुजी पुणे.
जय श्रीनाथ
मकर संक्रांत
मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे सौर कालगणनाशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या अशा गोष्टी सुगड्यात भरून त्या देवाला अर्पण करतात बायका उखाणे घेतात हा सण जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात येतो मकर संक्रांति हा सण सूर्य देवतेला समर्पित केला जातो शिवाय हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाचे बहुमोल असे महत्त्व आहे आणि याचे वर्णन आपल्याला गायत्री मंत्राच्या स्वरूपात वेदांमध्ये देखील असल्याचे दिसून येते या खेरीज मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण चालू होते आणि हा उत्तरायणाचा सहा महिन्यांचा काळ हिंदू धर्मामध्ये शुभ मानला जातो त्याच बरोबर मकर संक्रांतीचे अध्यात्मिक महत्त्व देखील भरपूर आहे त्यामुळे सगळे लोक या दिवशी पवित्र नद्या असलेल्या ठिकाणी उदाहरणार्थ गंगा यमुना गोदावरी कृष्णा आणि कावेरी या मध्ये आंघोळ करतात या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आपल्या पापांचा सर्वनाश होतो मकरसंक्रांतीच्या शुभ काळात स्नान दान तप जप यज्ञ या गोष्टींना विशेष महत्व आहे मकर संक्रांती चे यंदाचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करिता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणनार्थ मोती धारण केले आहे वार नाव राक्षसी व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदायिक मुहूर्त 30 आहेत दक्षिणेकडून उत्तरेस जात आहे आणि ईशान्येकडे पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीच्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांति जेथून आले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल तीळ आणि गूळ हे उष्ण असल्यामुळे या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ अर्पण करतो आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा ही संक्रांत सगळ्यांना रोगमुक्त व दीर्घायु आरोग्य प्रदान करो ही सद्गुरू चरणी प्रार्थना
प्रवीण देशपांडे गुरुजी पुणे
9011053497